NEET Result : अहिल्यानगरनंतर आता सांगलीतही विद्यार्थीनीने जीवन संपवलं…कारण तेच..

सांगली जिल्ह्यात मसूरमध्ये नीट परीक्षेत अपयश आल्याने 18 वर्षीय विद्यार्थीनीने विषारी वड्या खाऊन जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली.

Untitle (25)

NEET Result : सांगली जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूरमध्ये नीट परीक्षेत (NEET Result ) अपयश आल्याने 18 वर्षीय विद्यार्थीनीने विषारी वड्या खाऊन जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली. समीक्षा दीपक पवार असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून विषारी वड्या खाल्यानंतर तिला कराडच्या रुग्णालयात दाखल केले परंतू तिचा मृत्यू झाला.

हरिनामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणाचा आदर; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे अनोखा पालखी सोहळा

समीक्षा हिने गेल्या वर्षी नीट परीक्षा दिली होती. या परीक्षेत तिला अपयश आल्यानने ती मानसिक तणावात होती. अशाच अवस्थेत असताना तिने दि. 23 रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. त्यानंतर तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

दोन दिवसांनंतर समीक्षाच्या शरीरावर विषाचा परिणाम होऊ लागला. तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. त्यानंतर तिने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले परंतू सोमवारी समीक्षाची प्राणज्योत मालवली.

E20 पेट्रोलबाबतच्या कथित डीपफेक आणि बदनामीकारक मजकुराविरोधात नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाची दिलासा

नीट परीक्षेत अपयश आल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली ही घटना ताजी असतानाच दुसरी एक घटना समोर आलीयं.

follow us