जिल्हा परिषदेचे CEO आशिष येरेकरांच्या विरोधात खा. लंकेंची तक्रार, ‘त्या’ प्रकरणात तपास करण्याची मागणी

जिल्हा परिषदेचे CEO आशिष येरेकरांच्या विरोधात खा. लंकेंची तक्रार, ‘त्या’ प्रकरणात तपास करण्याची मागणी

Nilesh Lanke On Zilla Parishad CEO Ashish Yerekar : नगर जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर (Ashish Yerekar) यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत असून त्यांच्या या अनुपस्थितीचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक (Sujata Sainik) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

मुख्य सचिवांना पाठविण्यात आलेल्या पत्रात खा. लंके यांनी म्हटले आहे की, येरेकर यांची कार्यालयातील अनुपस्थिती वारंवार निदर्शनास येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यप्रणालीवर आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजावर वितरीत परिणाम झाला आहे. येरेकर यांच्या सततच्या अनुपस्थितीतमुळे अनेक सामन्य नागरिकांची प्रशासकीय कामे प्रलंबित राहिली आहेत. यासंबंधी अनेक नागरिकांनी आपल्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत.

येरेकरांच्या अनुपस्थितीमुळे महत्वाचे निर्णय घेताना विलंब होत असून त्याचा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नकारात्मक परिणाम होत आहे. असं खासदार लंके यांनी पत्रात म्हटले आहे.

कारवाई करावी

जिल्हा परिषदेच्या कामकाजात नियमितता आणण्यासाठी त्वरीत उपाययोजना केल्या जाव्यात तसेच या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी खा. लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला.., उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको, रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

महिन्यात फक्त दोनदा उपस्थिती

अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेच्या सीईओ दालनातील फेब्रुवारी महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीईओ येरेकर हे 24 फेब्रुवारी रोजी दोन मिनिटे व 25 फेब्रुवारी रोजी 32 मिनिटे दालनात उपस्थित असल्याचे दिसत आहे. इतर दिवशी ते पुर्णपणे अनुपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान येरेकरांच्या दालनातील सीसीटीव्ही फुटेज खा. लंके यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना देखील पाठविले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube