विचारधारा अन् पक्ष एकच, मी साहेबांचं नेतृत्व सोडलेलं नाही; लंकेंकडून अखेर शिक्कामोर्तब
Nilesh Lanke : अखेर अजित पवार यांना धक्का देत पारनेरचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke )राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar Group)प्रवेश केला आहे. अगोदर लंके यांची पवारांसोबत बैठक झाली त्यानंतर त्यांनी पवारांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी म्हटलं की, विचारधारा आणि पक्ष म्हणजे एकच आहे. तसेच साहेबांचे नेतृत्व आम्ही कधीच सोडलं नाही.
अक्षय कुमार दिग्दर्शक मृघदीप सिंग लांबा आणि निर्माता महावीर जैनसोबत नवीन प्रोजेक्ट करणार?
यावेळी बोलताना लंके म्हणाले की, पत्रकारांनी मला विचारलं की आज तुम्ही शरद पवार गटात प्रवेश करणार का? मात्र मी शरद पवार यांच्या विचारधारेबरोबरच आहे. 2019 च्या माझ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ देखील पवारांनी केला होता. मी लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचा आणि कामाचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आहे.
Nilesh Lanke : शरद पवार अन् निलेश लंकेंची भेट, पत्रकार परिषदही पण..,
कोरोना काळामध्ये मी जे काही काम करू शकलो आरोग्य मंदिर उभारू शकलो त्यामागे पवारांची ताकद माझ्या मागे होती. तसेच कोरोनामध्ये माझ्यासोबत घडलेल्या सर्व काही घटनांचा उल्लेख मी माझ्या पुस्तकामध्ये केला आहे. म्हणूनच त्या पुस्तकाचं नाव ‘मी अनुभवलेला कोविड’ असंच ठेवला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे प्रकाशन देखील शरद पवार यांनी करावं. त्यासाठी त्यांना विनंती केली.
शरद पवारांचं नाव आणि फोटो वापरू नका, SC ने अजित पवारांना फटकारलं
तसेच यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना लंके म्हणाले की, विचारधारा आणि पक्ष म्हणजे एकच आहे. तसेच साहेबांचे नेतृत्व आम्ही कधीच सोडलं नाही. तसेच पवार साहेबांसोबत मी अद्यापही कोणत्याही निवडणुकीची आणि खासदारकीची चर्चा केलेली नाही. तसेच अजित पवारांचं माजी आमदारकी रद्द करण्याबाबतचे वक्तव्य मी ऐकलं नाही. त्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही.
तसेच अमोल कोल्हे यांच्यासोबत माझं 2019 च्या आधीपासूनचं भावासारखा नात आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी माझ्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्राचा आयोजन केलं होतं. मात्र या महाराष्ट्राच्या दरम्यान आम्ही कोणताही पक्षप्रवेशाचा किंवा निवडणुकीचा विषय काढलेला नाही. तसेच आपल्या हातामध्ये आता घड्याळ असणार की तुतारी हे शरद पवार ठरवतील. त्यांच्या मंचावरून दुसरीकडे जाणं शक्य आहे का? पवार साहेब आमचे सर्वेसर्वा आहेत. ते सांगतील तोच आदेश. असं म्हणत लंके यांनी आपण शरद पवार गटात असलेल्याचं सांगितलं.