नितेश राणेंना चिखलफेक प्रकरण भोवलं, न्यायालयाने सुनावली 1 महिना कारावास, 1 लाख दंडाची शिक्षा

सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना एक महिन्याच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 46

Nitesh Rane is embroiled in a mudslinging case : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून 2019 साली गाजलेल्या कणकवलीतील चिखलफेक प्रकरणात भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर, राणे यांना गंभीर आरोपांतून दिलासा मिळाला असला तरी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना एक महिन्याच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या शिक्षेवर स्थगिती मिळावी यासाठी राणे उच्च न्यालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून 2019 साली गाजलेल्या कणकवलीतील चिखलफेक प्रकरणात भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याबाबत जिल्हा व स्तर न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. या निकालानंतर, राणे यांना गंभीर आरोपांतून दिलासा मिळाला असला तरी सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याच्या आरोपाखाली त्यांना एक महिन्याच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या शिक्षेवर स्थगिती मिळावी यासाठी राणे उच्च न्यालयात धाव घेणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.

हे संपूर्ण प्रकरण 2019 सालातील होते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे, साचलेला चिखल आणि त्यामुळे नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास याविरोधात त्यांनी कणकवली येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनादरम्यान संतापाच्या भरात राणे आणि त्यांच्या समर्थकांनी तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. सामान्य जनता रोज चिखलातून जात आहे, तोच अनुभव तुम्ही देखील घ्या, असे म्हणत हा प्रकार करण्यात आला होता. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि या प्रकारची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती.

जहाजावर इराणचा हल्ला! 12 खलाशी भारतीय, आखातात खळबळ

या प्रकरणी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नितेश राणे, माजी नगराध्यक्ष बाबू गायकवाड, संजय कामतेकर आणि सुमारे 40 कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि धमकावणे यांसारख्या गंभीर कलमांचा समावेश होता.

प्रकरणाची सखोल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. भादंवि कलम 353, 332 आणि 506 अंतर्गत असलेल्या गंभीर आरोपांतून नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे, सरकारी कामात अडथळा आणणे आणि धमकावणे या आरोपांतून त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, कलम 504 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवत त्यांना एक महिन्यांचा साधा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी यासाठी राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी तातडीने अर्ज दाखल केला असून, लवकरच या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुढील टप्पा आता उच्च न्यायालयात उलगडणार असून, त्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

follow us