प्रत्येक धर्मात काही सडके आंबे असतात, अशोक खरात प्रकरणावर नितेश राणेंनी दिली प्रतिक्रिया

प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, मात्र सरकार महिलांच्या बाजूने ठामपाने उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Written By: Published:
Untitled Design 77

Nitesh Rane reacted to the Ashok Kharat case : नाशिकमधील भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून अनेक राजकीय नेत्यांचे फोटो अशोक खरातसोबत व्हायरल झाल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.

दरम्यान, या प्रकरणावर मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देत पीडित महिलांना थेट सरकारशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणातील महिलांनी सरकारशी थेट संपर्क साधावा. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, मात्र सरकार महिलांच्या बाजूने ठामपाने उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पिंपरी चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. तसेच या भोंदू बाबाचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध असल्याच्या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न करत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

हर्षवर्धन सदगीर डब्बल महाराष्ट्र केसरी ! नाशिकच्या पठ्ठ्याने पटकाविली मानाची गदा

विरोधकांवर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, हिंदू धर्माची बदनामी होत असताना काही जणांना त्यातच आनंद मिळतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. दरम्यान, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एकामागून एक धक्कादायक कारनामे समोर येत आहेत. राजकीय वरदहस्तामुळे त्याचे गोरखधंदे सुरू होते, अशी देखील चर्चा रंगली आहे. तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात महिलांसोबतचे 100 हुन अधिक व्हिडिओ समोर आल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर धमक्या देत आणि दमदाटी करून त्याने मोकयाच्य जमिनी देखील बालकावल्याचे आरोप पुढे येत आहेत.

या प्रकरणात खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याने महिलांसोबतच्या कृत्यांचे व्हिडिओ चित्रित केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एका पीडितेला आणि अशोक खरात याला ब्लॅकमेल करण्यासाठी त्याने के व्हिडिओ लीक केल्याचे सांगितले जात असून त्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन कारण्यात आले आहे. या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अशोक खरात विरोधात दाखल तीन गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरू असून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडिओंमधून समोर आले आहे.

follow us