Nitin Gadkari : …म्हणून मी मुंडेंच्या पाया पडलो होतो; गडकरींनी नाशिकमध्ये जागवल्या आठवणी

Nitin Gadkari : …म्हणून मी मुंडेंच्या पाया पडलो होतो; गडकरींनी नाशिकमध्ये जागवल्या आठवणी

नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.

गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. याव्यतिरिक्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे व इतर नेते उपस्थित होते.

Pankaja Munde : ‘गोपीनाथ मुंडेंचं स्मारक बांधू नका, त्यापेक्षा….’

यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. गोपीनाथ मुंडे हे माझे अध्यक्ष होते याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या नेतृत्वात मी राजकारणाची सुरुवात केली. मी  भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर इंदूरला एक भव्य कार्यक्रम झाला होता. तेव्हा अनेक दिग्गज नेते हजर होते. पण तेव्हा मी फक्त दोनच व्यक्तींच्या पाया पडलो. एक म्हणजे लालकृष्ण आडवणी  व दुसरे गोपीनाथ मुंडे होय. यावर त्यांनी मला विचारले माझ्या पाया का पडला. मी म्हणालो, तुम्ही माझे नेते आहात व मी कुठेही असलो तरी तुम्ही माझे नेते असाल, अशा शब्दात गडकरींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अहमदनगरमध्ये गोपीनाथ गड उभारणार; महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंची घोषणा

गोपीनाथ मुंडे यांचे पक्षासाठी  मोठे योगदान आहे.  उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत या नेत्यांनी भाजपचा  पाया उभा केला. त्यानंतर गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी पक्ष वाढवला. गोपीनाथराव यांनी भाजप पक्ष  वंचित, ओबिसी घटकांपर्यंत पक्ष पोहोचवला, असे गडकरी म्हणाले. गोपीनाथराव यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेने सरकार हादरलं होते आणि त्यामुळेच पहिल्यांदा 1995 साली शिवसेना-भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले होते. गोपीनाथराव  यांचे कार्यकर्तृत्व विलक्षण होते.  ते  रात्री 12, 1  वाजता कार्यकर्त्यांना भेटायचे. आपल्या कार्यकर्त्यांसाठी जिवाची बाजी लावायचे. महाराष्ट्राचे मंत्री म्हणून त्यांना विकासाची दृष्टी होती, असे गडकरींनी सांगितले.

‘आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..

गोपीनाथराव यांचा अकाली मृत्यू हा आपल्या सगळ्यांसाठी आघात आहे. व्यक्ती गेला तरी विचार जिवंत असतात. आज  पंकजाताई व प्रितम त्यांचा वारसा चालवत आहेत. एखादी सत्ता डोळे नष्ट करु शकते पण मनातील विचार कोणीही नष्ट करु शकत नाही, असे म्हणत नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागृत केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube