‘…चून-चून के मारेंगे’ म्हणणं नितेश राणेंच्या अंगलट! अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल…
Nitesh Rane News : अहमदनगरमध्ये काल 1 सप्टेंबर रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने रामगिरी महाराजांच्या समर्थनात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. या मोर्चादरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. रामगिरी महाराजांना विरोध केल्यास चून-चून के मारेंगे, अशी खुलेआम धमकीच राणे यांनी यावेळी दिली होती.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला हजेरी लावली. अहमदनगर बस स्थानकापासून काढण्यात आलेल्या या मोर्चाची सांगता दिल्लीगेट परिसरात झाली. सांगतेदरम्यान छोटेखानी सभा पार पडली. या जाहीर सभेत नितेश राणे म्हणाले, रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी गेलं तर एक-एकाला पकडून मारु, आमचे अब्बा तुमच्या अब्बांच्या पाकिस्तानात नाही तर हिंदुस्तानात बोलले आहेत. त्यामुळे एवढ्या संख्येने बाहेर येऊ की किड्या-मकोड्यासारखं मारु, ज्या रॅलीत नितेश राणे चालतो, तिकडं कोणी येत नाही, हा हिंदुंचा देश येथे फक्त भगवंतांचे चालेल बाकी कोणाचे नाही, कोणीही मस्ती केली तर चून-चून के मारेंगे, अशी धमकीच नितेश राणे यांनी दिली होती.
नितेश राणे यांच्या विधानानंतर अहमदनगरमधील मुस्लिम समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलीयं. आमदार राणे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी मुस्लिम समाजाच्यावतीने निवदेनाद्वारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्याविरोधात कलम 302, कलम 153 सहित अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांतदादा आणि बालवडकरांमध्ये ‘पोस्टर वॉर’; दोघांचे एकाचवेळी, एकाच भागात महिलांसाठी कार्यक्रम
महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर रामगिरी महाराजांच्या विधानावर मुस्लिम समाजाकडून आक्षेप घेण्यात आला होता. महाराजांविरोधात आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यानंतर रामगिरी महाराजांच्या समर्थनात हिंदू समाजाच्यावतीने काल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे आयोजक दिगंबर गेंट्याल यांच्यासह आमदार नितेश राणे यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधीही नितेश राणे यांनी श्रीरामपूरात वादग्रस्त भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.