अहमदनगर व्यापारी हल्ला… यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल
Ahmednagar Traders Attacked : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी शहरातील कापड बाजारात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आता व्यापाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. या हल्ल्याचा भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी निषेध केला आहे. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांवर वारंवार हल्ला केला जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहोत. तसेच असे हल्ले पुन्हा झाल्यास त्याला त्याचपद्धतीने उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी गंधे यांनी लेट्सअपशी बोलताना दिला आहे.
नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
अहमदनगर शहरातील कापडबजार परिसरात दीपक नवलानी व प्राणिल बोगावत या दोन व्यवसायिकांवर हल्ला झाल्याची घटना घडली. साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना भर बाजारपेठेत घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.
दरम्यान शुक्रवारी दुपारी हल्लेखोर व व्यावसायिक यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर ते मिटवण्यात आले होते. सायंकाळी अचानक त्याने दुकानात घुसून वाद घालण्यास सुरुवात केली. व नवलानी यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या बोगावत हेही यात जखमी झाले आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी व व्यापाऱ्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.
Sanjay Raut : नागपूरच्या वज्रमूठ सभेत अजित पवारांना डावललं? राऊत स्पष्टच बोलले
या हल्ला प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
शहरातील व्यापाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आहे. विशिष्ट समाजाच्या लोकांकडून हिंदू समाजाच्या व्यक्तींवर हल्ले केले जात आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व गृहमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच पुढील काळात असे हल्ले झाल्यास हिंदू बांधवांकडून जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा गंधे यांनी दिला आहे.
नगर तापले ! व्यापाऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या
पोलिसांवर राजकीय दबाव
काय राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून पोलीस प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. या संदर्भात आम्ही शहरातील परिस्थिती बाबत तसेच पक्षाची असलेली भूमिका गृहमंत्री फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांशी चर्चा करणार आहोत. तसेच चर्चेतून प्रशासनाला सूचना देण्यात याव्यात अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करणार आहोत.