पांगरमल प्रकरणातील आरोपी भाग्यश्री मोकाटेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

पांगरमल प्रकरणातील आरोपी भाग्यश्री मोकाटेला अटक; दोन दिवसांची पोलीस कोठडी

Ahmednagar Crime : पांगरमल (ता. नगर) येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या दारूकांडातील (Pangarmal case) आरोपी भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate arrested) हिला सीआयडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी मोकाटे हिला न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली होती. त्यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या भाग्यश्री मोकाटे हिच्यासह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात काही आरोपींना अटक झाली.

Muzaffarnagar school slap video : Alt न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

या सर्व आरोपींविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. आरोपी भाग्यश्री मोकाटे ही गुन्हा घडल्यापासून फरार होती. तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. सीआयडीने मोकाटेला अटक करून मोक्का न्यायालयासमोर हजर केले. सीआयडीतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांची त्या मुलगी आहेत. शिवसेनेकडून त्या जिल्हा परिषद सदस्या म्हणून निवडून आल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube