Lumpy Skin Disease : बैलगाडा शर्यतीवर येणार बंदी? खासदार विखेंचा इशारा

Lumpy Skin Disease : बैलगाडा शर्यतीवर येणार बंदी? खासदार विखेंचा इशारा

Ahmednagar : जिल्ह्यातील पशुधन पुन्हा एकदा संकटात आले असल्याचे समोर आले आहे. जनावरांमधील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव लसीकरणामुळे (Vaccination)कमी झालेला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या रोगाने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. यावर खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe)यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे.

Ahmedangar News : कारचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकला जोरदार धडक! अपघातात दोघे ठार तर तिघे जखमी…

लम्पीचा वाढता प्रादुर्भाव पाहता कदाचित ही कोविडसारखी दुसरी लाट असू शकते. तसेच जनावरांच्या ज्या स्पर्धा आयोजित केल्या जात होत्या, त्यावर पुन्हा एकदा निर्बंध आणले जातील, असा इशारा खासदार सुजय विखे यांनी दिले आहेत.

NEET Exam : मुलावर अंत्यसंस्कार केल्यानंतर वडिलांनी संपवले जीवन; चेन्नईतील घटना

हर घर तिरंगा या उपक्रमासाठी आज नगर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अभय आगरकर, महेंद्र गंधे, बाबासाहेब वाकळे, अरुण मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना विखे यांनी ‘लम्पी’ संकटावर भाष्य केले. विखे म्हणाले, जनावरांमधील लम्पीचा आजार रोखला जावा यासाठी यापूर्वी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवली होती. मात्र आता पुन्हा एकदा हे संकट समोर आले आहे. लसीकरणानंतर हा रोग आटोक्यात आला होता.

कदाचित हे कोविडच्या दुसऱ्या लाटेप्रमाणे पुन्हा एकदा हा जनावरांमधील रोगाचा प्रादुर्भाव वाढला असू शकतो. यासाठी आपण पुन्हा एकदा जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवणार आहोत, याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत, असेही खासदार विखे यांनी सांगितले.

त्याचबरोबर लसीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक जनावराला सुरक्षित ठेवण्याचे काम हे राज्य सरकारकडून केले जाईल. जे निर्बंध जनावरांच्या बाबतीत किंवा जनावरे एकत्रित आणणे तसेच जनावरांच्या स्पर्धा भरवणे, जे निर्बंध मागील लम्पीच्या लाटेत होते तेच निर्बंध आता पुन्हा एकदा लागू केले जाणार असल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली आहे.

दरम्यान नवे निर्बंध लागू झाल्यास पुन्हा एकदा राज्यात बैलगाडा शर्यती भरवण्यावर बंदी घातली जाईल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे, असेही यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube