दुधातील भेसळ रडारवर.. मंत्री विखे म्हणतात, तक्रार करा लगेच कारवाई करू

दुधातील भेसळ रडारवर.. मंत्री विखे म्हणतात, तक्रार करा लगेच कारवाई करू

Radhakrishna Vikhe : दूध भेसळीचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावर समोर येत असून याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. असे भेसळीचे प्रकार कुठे आढळून आले तर तत्काळ टोल फ्री नंबरवर संपर्क करा. तक्रारीची तत्काळ कारवाई करू, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी केले.

शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या महापशुधन एक्सपो कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धराम सालिमठ, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू शरद गडाख आदी उपस्थित होते.

वाचा : तब्बल 46 एकरात भरणार देशातील सर्वात मोठा ‘महापशुधन एक्सपो.. 

विखे म्हणाले, राज्यात आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही सातत्याने दूध भेसळ याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत.  त्यावर आम्ही कडक कारवाई देखील केली आहे. अजूनही कुठे असे प्रकार होत असतील तर याबाबत टोल फ्री नंबरवर तत्काळ तक्रार करावी आम्ही लगेच कारवाई करू असे त्यांनी सांगितले.

महापशुधन एक्स्पोच्या माध्यमातून शेतकरी व पशुपालकांना नवीन तंत्रज्ञान तसेच कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे मिळविता येते याबाबत माहिती मिळते. शिवाय विविध प्रजातींचे पशु पक्षी यांचे संगोपन कशा पद्धतीने करावे याबाबत ज्ञान मिळते. जेणेकरून होणारे नुकसान टाळून शेती पूरक व्यवसाय यशस्वी करता येईल.

Sujay Vikhe- Patil: शिर्डीत आजपासून महापशुधन एक्सपो; शेतकऱ्यांसाठी पर्वणी

लम्पी स्किन संसर्गात आम्ही राज्यातील दीड कोटी पशुचे मोफत लसीकरण केले आणि आता कायम स्वरुपी लसीकरणासाठी याची लस निर्माण देखील करण्याचे काम सुरू आह. राज्यात गोसेवा आयोगाच्या माध्यमातून पशुसंवर्धन व संशोधन यास प्राधान्य देणार असल्याचे विखे यांनी सांगितले.

खा. डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणात सांगितले, की महाएक्सपो उपक्रमाचा फायदा पशुपालकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. देशाच्या १२ राज्यांतून ८९ विविध प्रजातीचे पशु प्रदर्शनासाठी आले आहे.  हे सर्व आपल्याला पहावयास मिळणार आहे. पशुसंर्धन विभागाने पशुपालनाबाबत तसेच विविध प्रजातीची माहिती डायरीत एकत्रित केली. या डायरीचे विमोचन यावेळी करण्यात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube