Ahmednagar News : साईभक्तांसाठी मोठी बातमी! साईंच्या पेड दर्शनसाठी आता ओळखपत्र अनिवार्य

Ahmednagar News : साईभक्तांसाठी मोठी बातमी! साईंच्या पेड दर्शनसाठी आता ओळखपत्र अनिवार्य

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar News) शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो साई भक्त दररोज शिर्डीत हजेरी लावत असतात. यातील अनेकजण पेड दर्शनपास घेऊन साईंचे दर्शन घेतात. तर अनेक जण आरतीच्या पाससाठी रांगेत उभे राहतात. याचाच फायदा काही एजंट घेत असून साई भक्तांची फसवणूक होत असल्याचं समोर आले आहे.

Bacchu Kadu : CM शिंदेंचं एन्काउंटर.. बच्चू कडू म्हणाले, तथ्य असेल तर..

या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने आता पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले आहे. जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे. त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास दिला जाणार आहे. त्यामुळे आता पेड दर्शनपास घेऊन साईंचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना ओळखपत्राची खात्री करूनच दर्शन दिले जाणार आहे.

ऑनलाईन पोर्टलवर या सुविधा उपलब्ध

साईबाबांच्या दर्शनासाठी असलेली गर्दी पाहून पेड दर्शनपास हा पर्याय निवडून अनेक जण हा  पास घेतात व दर्शन करतात. तर आरती पास घेण्यासाठी सुद्धा अनेकदा भक्तांना रांगेत उभे राहावे लागत असते. मात्र हे सगळं होत असताना काही एजंट साई भक्तांची आर्थिक फसवणूक करत असल्याच्या  तक्रारी साईबाबा संस्थानला प्राप्त झाल्या होत्या.

Shipa Shetty चा साडीलूक व्हायरल, पाहा फोटो

साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन पोर्टलवर या दोन्ही सुविधा उपलब्ध असल्या तरी अनेकदा या ठिकाणी पास मिळत नाही. त्यामुळे एजंट याचा फायदा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे. सामान्य दर्शन रांगेतून दर्शन घेण्यासाठी कुठल्याही पासची आवश्यकता नाही. मात्र पेड पास किंवा आरती पास घ्यायचा असेल तर ओळखपत्र हे अनिवार्य असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube