Ahmednagar News : मंत्री विखेंच्या हस्ते होणार महसूल भवनाचे भूमिपूजन…

Ahmednagar News : मंत्री विखेंच्या हस्ते होणार महसूल भवनाचे भूमिपूजन…

Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) येथे महसूल भवन इमारतीचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आता या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते महसूल भवनाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.

MP Election 2023 : मध्य प्रदेशात काँग्रेसचं ठरलं! 500 रुपयात गॅस, महिलांना 1500

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले हे उपस्थित राहणार असून आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. प्रा. राम शिंदे, आ.संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ४७.८६ कोटी रुपये खर्च करून हे महसूल भवन बांधण्यात येणार असून अहमदनगर जिल्ह्यासाठी हे भवन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय; रोहित पवारांचा शिंदे सरकारला इशारा

अहमदनगर तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी दुपारी तीन वाजता, तहसील ऑफिस जवळ टीव्ही सेंटर परिसर अहमदनगर येथे होणार आहे. या महसूल भवन इमारतीच्या भूमिपूजन समारंभास महायुतीचे जेष्ठ नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकाभव्य समारंभाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube