Ahmednagar News : नगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; लाखोंचे सोने लंपास

Ahmednagar News : नगरमध्ये ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; लाखोंचे सोने लंपास

Ahmednagar News : नगर शहरातील सराफ बाजार भागातील (Ahmednagar News) वर्मा ज्वेलर्सवर पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. आज रविवारी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून पोलिसांना सीसीटीव्हीचे फुटेज मिळाले आहे. यामध्ये ज्वेलर्समोरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये 7 चोरटे कैद झाले आहेत. या दरोड्याच्या प्रकारामुळे सराफ बाजारात खळबळ उडाली आहे. शहरातही याच दरोड्याची चर्चा सुरू आहे.

Road Accident : भरधाव कंटेनर दुचाकीला धडकला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी, सराफ बाजारातील संतोष वर्मा यांच्या मालकीच्या वर्मा ज्वेलर्सवर पहाटेच्या सुमारास सात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. सहा ते सात दरोडेखोर असल्याचा संशय असून त्यांच्याकडे अनेक धारदार शस्त्र देखील आढळून आले आहे. चोरट्यांनी दुकानातून तब्ब्ल सातशे ग्रॅम सोने लंपास केले असून त्याची किंमत चाळीस लाखांच्या आसपास आहे. भरवस्तीत असलेल्या सराफ बाजारात पडलेल्या दरोडामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, चोरीची घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव दाखल झाले आहेत. श्वान पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. संशयित आरोपींच्या हाताचे ठसे घेण्याचे देखील काम पोलिस प्रशासनाने सुरू केले आहे. या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक रोड येथून चोरीला गेलेल्या वाहनातून हे दरोडेखोर सराफ बाजारात दाखल झाले होते, असे समजते. या घटनेचा तपास करून चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत.

Maharashtra Rain : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, उत्तर महाराष्ट्रातून 4 दिवसांत पाऊस मागे फिरणार

चोरीच्या वाहनाने आलेल्या दरोडेखोरांनी सराफ बाजारातील वर्मा ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला. सहा ते सात दरोडेखोरांचा या घटनेत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडे धारदार शस्त्रे होती. शिवाय गॅस कटर देखील सोबत आणले होते. भरवस्तीत पडलेल्या या दरोड्यामुळे येथील व्यावसायिक, दुकानदार हादरून गेले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube