Ahmednagar : डोक्यात गोळी घुसल्याने युवक जखमी; पोलिसांनी सांगितलं काय घडलं?

Ahmednagar : डोक्यात गोळी घुसल्याने युवक जखमी; पोलिसांनी सांगितलं काय घडलं?

Ahmednagar : शहरातील उपनगर भागांमधील (Ahmednagar) गजराजनगर या परिसरात एका युवकाच्या डोक्याला अचानक एक गोळी लागून गेली या गोळीत युवक जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अहमदनगर शहरालगत असलेल्या लष्करी प्रशिक्षण केंद्रात गोळीबार सुरू होता त्यावेळेस गजराजनगर येथे किरण मांजरे हा युवक गाडीवरून जात असताना त्याच्या डोळ्याला अचानक एक गोळी लागून गेली त्यामध्ये हा युवक जखमी झाला. ही गोळी लष्करी लष्कराच्या बिटियारमधली असल्यामुळे याचा सखोल तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल असे एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

Mumbai : इमारतीला भीषण आग! 6 जणांचा होरपळून मृत्यू, 14 जखमी

किरण मांजरे हा युवक गुरुवारी सायंकाळी गजराजनगर येथील पेट्रोल पंपाजवळून जात असताना अचानक त्याच्या डोक्या गोळी घुसली. अनोळखी व्यक्तीनेच गोळीबार केल्याचे सुरुवातीला वाटत होते. या घटनेची माहिती नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सानप घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहिती घेतली असता बीटीआर येथे रात्रीच्या वेळी सुरू असलेल्य सरावादरम्यान गोळी मांजरे याच्या डोक्यात घुसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

लष्कराचा रस्त्याने बीटीआरमधून अनेकदा गोळीबार झाला आहे. सुदैवाने यामध्ये किरणला काही झाले नाही मात्र या परिसरात जाणाऱ्या मुलांना व इतर नागरिकांना याचा धोका होऊ शकतो कारण यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत त्यामुळे लष्कराने या प्रकरणी काळजी घ्यावी असे जखमी किरण मांजरे यांनी सांगितले. मांजरे यांच्यावर रुग्णालयात उपचार करून डॉक्टरांनी गोळी बाहेर काढली.

‘उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही’; नारायण राणेंची कडू टीका

घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, तोफखाना पोलीस ठाण्याचेड पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक निरीक्षक नितीन रणदिवे, मुजावर यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube