विजय औटीसह तिघांचे जामीन फेटाळले, नगरच्या सत्र न्यायालयाचा निर्णय
Ahmednagar Politics : खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे सहकारी अॅड. राहुल झावरे (Adv. Rahul zaware) यांच्यावर ६ जून रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक विजय सदाशिव औटी (Vijay Sadashiv Outi) याच्यासह प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे (Mangesh Kavre) यांचे जामीन अर्ज नगरच्या सत्र न्यायालयाने (Ahmednagar Sessions Court) बुधवारी (दि. 3 जून) फेटाळले आहेच. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयामुळे विजय औटी आणि इतरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर कारवाई, थेट ‘या’ राज्यात बदली
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 6 जून रोजी निलेश लंके यांचे सहकारी अॅड. राहुल झावरे आणि इतरांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. या कारणावरून माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी, त्याचा भाऊ माजी नगरसेवक नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे, अंकुश भागाजी ठुबे, नीलेश उर्फ धनू दिनकर घुमटकर, संगम सोनवणे, नामदेव लक्ष्मण औटी, पवन बाबा औटी, प्रमोद जगन्नाथ रोहोकले, प्रथमेश दत्तात्रय रोहोकले, सुरेश अशोक औटी यांनी पारनेर शहरामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी विजय औटी, नंदू औटी, प्रितेश पानमंद, मंगेश कावरे यांना त्याच दिवशी अटक केली होती. पुढे न्यायालयाने त्यांना अनुक्रमेपाच व तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
महाविकास आघाडीत मुख्यमंत्री किती? प्रविण दरेकरांनी यादी वाचत खिल्ली उडवली
चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी नगरच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले होते. या अर्जावर मंगळवारी युक्तीवाद होऊन न्यायालायने विजय औठी, प्रितेश पानमंद आणि मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज फेटाळले. तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या नंदू औटी याचा जामीन अर्ज सादर करण्यात आला नव्हता. दरम्यान, जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने विजय औटी आणि इतरांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.