कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरवर कारवाई, थेट ‘या’ राज्यात बदली
Kulwinder Kaur Transfer : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिमाचलमधील मंडी मतदारसंघातून खासदार झाल्यानंतर एका विमातळावर सीआयएसएफ कॉन्स्टेबल महिलेनं कंगनावर हात उचलला होता. त्यानंतर या महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करावी, अशी मागणीही कंगनाने केली होती. दरम्यान, आता सीआयएसएफ महिला जवान कुलविंदर कौर (Kulwinder Kaur) यांची बदली करण्यात आली आहे.
ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी…; नवनाथ वाघमारेंचा दावा
नेमकी घटना काय?
खासदार झाल्यानंतर कंगना पहिल्यांदाच दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर पोहोचली होती. त्यावेळी विमानात चढण्यापूर्वी एका CISF कॉन्स्टेबल महिलेनं कंगनाच्या कानशिलात लगावली होती. हा थप्पड मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. यामध्ये महिलेनं थप्पड मारण्याचे कारण सांगितले होतं. 100 रुपयांसाठी शेतकरी आंदोलनात महिला बसल्या आहेत, असे विधान कंगनाने केल्यानं तिच्या कानशिलात लगावल्याचं महिला कॉन्स्टेबलने सांगितलं होतं.
पारनेर तालुक्यात गुंडाराज… हॉटेल चालकावर चॉपर तलवारीने वार
त्यानंतर कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला होता. चंदिगड विमानतळावर CISF च्या एका महिलेनं आपल्या कानशिलात लगावून शिवीगाळ केल्याचा आरोप कंगनाने केला होता. पंजाबमध्ये दहशतवाद आणि हिंसाचारात वाढ झालेली आहे, असंही तिनं म्हटलं होतं.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर महिला कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई कऱण्यात येणार अशी चर्चा होती. मात्र, निलंबनाची कारवाई न करता या महिला कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली आहे. महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांची रवानगी थेट बेंगळुरूला करण्यात आली.
कोण आहेत कुलविंदर कौर?
सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर या पंजाबमधील सुलतानपूर लोधी येथील रहिवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून चंदीगड विमानतळावर तैनात आहेत. 2009 मध्ये त्या सीआयएसएफच्या सेवेत दाखल झाल्या होत्या. त्यांचा विवाह सीआयएसएफ जवानाशी झाला असून त्यांना दोन मुले आहे. त्यांचे भाऊ शेरसिंगही हे किसान मजदूर संघर्ष समितीचे संघटन सचिव आहेत.