ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी…; नवनाथ वाघमारेंचा दावा

ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी…; नवनाथ वाघमारेंचा दावा

Navnath Waghmare : ओबीसींमधून मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटी यांच्या अंतरवली सराटी गावात आणि जरांगे राहत असलेल्या परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात असल्याचे वृत्त आहे. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांकडे गंभीर तक्रार करत जरांगेंनी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. यावरून ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनी मोठा दावा केला आहे.

Champai Soren : झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा, हेमंत सोरेनकडे पुन्हा राज्याची धुरा 

जरांगे सध्या अंतरवली सराटीच्या सरपंचाच्या घरी मुक्कामी आहे. सोमवारी मध्यरात्री त्यांचा मुक्काम असलेल्या घरावर ओक ड्रोन घिरट्या घालत असल्याचं दिसून आलं. याविषयी बोलताना वाघमारे म्हणाले की, हा हास्यास्पद विषय आहे. ड्रोनने पाहणी केली तर काय फरक पडतो? आम्ही जिथे थांबलो तिथेही ड्रोन पाहणी केली तरी काय फरक फडणार आहे. हे कृत्य खोडसाळपणाचं आहे आणि त्यांच्यातीलच एकाने हा कार्यक्रम केलेलाा असू शकतो. आमच्या नेत्यांना सुरक्षा मिळावी, या मागणीसाठी कुणीतरी जाणीवपूर्वकही असे केलेले असू शकते, असं वाघमारे म्हणाले.

‘धीरज घाटेंनी हिंदू समाजाची मक्तेदारी घेतलेली नाही’; पुण्यात भाजप-काँग्रेस आमने सामने 

ड्रोन हा काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. कोणताही ओबीसी नेता हे करू शकत नाही. अशा गोष्टींसाठी कोणाला वेळ आहे? कदाचित जवळचे कोणीतरी प्रसिद्धीसाठी हे करत आहेत. काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी केलेलं हे काम हे, असा दावाही वाघमारे यांनी केला. जरांगेंना भीती वाटत असेल तर त्यांनी संरक्षण घ्यावे. त्याला आमचा विरोध नाही, ओबीसींकडून त्यांना कोणतीही भीती नाही. पण, त्यांच्याच माणसांकडून त्यांना भीती असेल, असं वाघमारे म्हणाले.

पवारांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी...
मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही नवनाथ वाघमारे यांनी केली. शरद पवार यांच्या पक्षाचे नेते राजेश टोपे सभागृहात सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावे. विशेषत: शरद पवार यांनीही याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे वाघमारे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज