वादळी वाऱ्यासह शहरात पावसाच्या रिमझिम सरी

वादळी वाऱ्यासह शहरात पावसाच्या रिमझिम सरी

Ahmednagar Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. तापमानाने थेट 40 अंश ओलांडले होते. यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. मात्र आता जूनच्या पहिल्याच आठवडयात वातावरणात बदल झाला आहे. अहमदनगर शरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे वातावरणात एक गारवा निर्माण झाला आहे.

नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र नगरकरांवर रविवारी दुपारीच रिमझिम पावसाचा शिडकावा झाला. दरम्यान गेल्या काही दिवसात नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीसच्यावर गेला होता. गेल्या आठवड्यापासून हवेत आर्द्रता वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

Opposition Meeting : नितीश कुमारांचा प्लॅन, ममतांचीही साथ पण, काँग्रेसने खेळच पलटविला!

यामध्ये दिलासा म्हणून जूनच्या पहिल्याच आठवड्यात उकाड्यावर पावसाचा उतारा पडावा असे घडले. रविवारी सकाळी कडक ऊन व दुपारी ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागले. व दुपारी एक वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरूवात झाली. पंधरा ते वीस मिनिटे पावसाचा शिडकावा होता. त‌थापि, सकाळी ढगाळ वातावरण होऊ लागल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Rain : अहमदनगर, नाशिकनंतर पुण्यातही पावसाची जोरदार बॅटिंग…

अचानक झालेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली
आज झालेल्या पावसामुळे गेल्या दोन – चार दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र एकीकडे हे असताना रविवारी नगर शहरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यावरील फळे, भाजीसह इतर साहित्य विक्रेत्यांची धांदल उडाली. पाऊस पडून गेल्यानंतर देखील उशिरापर्यंत आकाशात ढग मात्र कायम होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube