Ahmedngar MIDC च्या मुद्द्यावरून रोहित पवारांची विखेंवर खोचक टीका
Ahmedngar MIDC : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात सध्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) मुद्दा चांगलाच गाजतो आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कर्जत – जामखेडयेथील एमआयडीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. मात्र नुकतेच नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना मंजुरी मिळाल्याची माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली. आता याच मुद्द्यावरून आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
Jawan Release: माहिमच्या थिएटरबाहेर गोविंदांनी थर रचून केलं, किंगच्या जवानचं जोरदार स्वागत
आमदार रोहित पवार हे एमआयडीसीच्या (Ahmedngar MIDC) मुद्द्यावरून बोलताना म्हणाले, दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर शहर आणि शिर्डी येथे नवीन एमआयडीसींना मंजुरी मिळाली. नगर जिल्ह्यात दोन एमआयडीसीची घोषणा होत असताना कर्जत जामखेड तालुका हा दक्षिण लोकसभेच्या मतदारसंघात येत नसावा असे मला वाटते. अशा शब्दात आमदार पवार यांनी खासदार विखेंवर निशाणा साधला.
पाणी सोडा, अन्यथा… निळवंडेच्या पाण्यासाठी थोरातांचा आक्रमक ‘मूड’
तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, कर्जत जामखेडच्या एमआयडीसीचा (Ahmedngar MIDC) प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो महाविकास आघाडीच्या काळात सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र आता या सरकारने दोनच एमआयडीसीची घोषणा का केली? तिसरी एमआयडीसी यामध्ये का समाविष्ट केली नाही असा प्रश्न पवार यांनी थेट विखेंना केला.
कर्जत जामखेड मधील मतदारांची मते तुम्हाला नको आहेत का? 2019 मध्ये कर्जत जामखेड मधील मतदारांनी तुम्हाला मतदान केले नाही का हे तुम्ही स्पष्ट करावे. तसेच आगामी काळात म्हणजेच येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत कर्जत जामखेड मधील मतदारांकडे मत मागायला आल्यावर येथील जनता काय करेल हे आता येत्या निवडणुकीच्या वेळी दिसून येईल असा शाब्दिक टोला आमदार रोहित पवार यांनी खासदार सुजय विखे यांना लगावला आहे.