नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

  • Written By: Published:
नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

Ahmednagar Criem : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर सावेडीतील एकविरा चौकात काल (शनिवारी) रात्री उशिरा प्राणघातक हल्ला झाला. याच ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (attack on NCP worker in Ahmednagar city)

एकविरा चौकात चत्तर यांच्यावर काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यामुळे सावेडी परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास मतदार म्हणतात… जाणून घ्या कौल

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. आरोपींना जेरबंद करण्यासाठी त्यांनी पोलीस पथक रवाना केले आहे. रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी चत्तर यांची भेट घेतली. तसेच उपचार करत असलेल्या डॉक्टरांशी चर्चा झाली. यावेळी रुग्णालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमा होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube