गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला तर कारवाई करणार, दीपक केसरकरांचा इशारा

गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला तर कारवाई करणार, दीपक केसरकरांचा इशारा

Gautami Patil : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) हिचा कार्यक्रम शाळेत आयोजित केल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी कार्यक्रमाच्या नाशिक (Nashik) येथील आयोजकांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गौतमी पाटील नृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी गौतमीच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या गच्चीवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यावेळी शाळेच्या छतावरून पडून एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद शाळेतील गौतमीच्या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, गणपती विसर्जनादरम्यान अहमदनगरमध्ये परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी गौतमी पाटील हिच्यासह मंडळातील कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Ajit Pawar यांच्या सोबत गेलेल सर्व आमदार स्वगृही परतण्याच्या विचारात; जयंत पाटलांचा मोठा दावा

दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली
नाशिक जिल्ह्यातील नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील मुले शिकतात. दिंडोरी तालुक्यातील वालखेड गावात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात तरुणांनी सहभाग घेतला.

पहाटे पावणे चार वाजता झोपायला गेलो, इतक्यात…; शरद पवारांनी सांगितल्या किल्लारी भूकंपाच्या आठवणी

या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मुलांना काय हवंय? बसण्यासाठी चांगला बेंच असावा. शाळेच्या चांगल्या इमारती हव्यात, चांगल्या शौचालयांची गरज आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम कोणी आयोजित केला होता हे मला माहीत नाही. शाळेच्या आवारात ती नाचते तर आयोजकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube