नारायण डोह परिसरातील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय घडलं

नारायण डोह परिसरातील शाळेच्या मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल; जाणून घ्या नक्की काय घडलं

Ahmednagar Crime : अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला शिक्षक दिनाच्या दिवशी मारहाण करत धमकावले. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या आईने सेंट मायकल स्कूलच्या मुख्याध्यापिका नोंदिता डिसोजा यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गैरवर्तन, मारहाण, धमकावणे तसेच बाल न्याय कायद्यानुसार गुन्हा दाखल करून घेतला आहे.

चौथीच्या विद्यार्थ्याचे मुख्याध्यापिकेकडून मानसिक, शारीरिक, सामाजिक शोषण होत असल्याची बाब समोर आली होती. या संदर्भात विद्यार्थ्याच्या पालकांनी नगर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी जाधव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून योग्यती कारवाई करण्याची विनंती तक्रार अर्जात केली होती. विद्यार्थ्याच्या आईने नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दाखल फिर्यादनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

चौंडीतील उपोषणकर्त्यांकडे विखेंनी फिरवली पाठ, दखल न घेतल्याने धनगर आंदोलक संतप्त

फिर्यादीत म्हटले आहे की, विद्यार्थ्याला शाळेत येऊ नको, शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. तो शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी झाला म्हणून मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला मिटिंग हॉलमध्ये नेऊन मारहाण केली. तसेच आक्षेपार्ह शब्द वापरत नोटवर स्वाक्षरी आणली नाही तर जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करत आहेत. शाळेवरील कारवाई संदर्भातील प्रक्रिया शिक्षण विभागाकडून केली जाणार असल्याचे समजते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube