हनुमान जयंतीचा महाप्रसाद खाल्ल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा
Nashik Update : नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) महाप्रसादाचे सेवन (Food poisoning) केल्याने 60 हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव बर्हे गावात हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसाद खाल्ला होता. त्यानंतर लोकांनी उलट्या, अस्वस्थ वाटणे आणि पोटदुखीची तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्यांना बर्हे येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यातील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. कार्यक्रमाला लोकांची गर्दी असल्याने बाधितांची संख्या वाढू शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
आम्ही ‘त्या’ निर्णयाची वाटच पाहतोय; सत्तासंघर्षावर शरद पवारांचे सूचक वक्तव्य
गुड फ्रायडे निमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने बाऱ्हे आणि ठाणगाव आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी उपलब्ध नव्हते. बाधितांना वेळेवर उपचार भेटले नाहीत अशा नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. ग्रामस्थांनी वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर रुग्णांना उपचार मिळाले.
या सर्व परिस्थितीचा पालकमंत्री दादा भुसे यांनी आढावा घेऊन बाधितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांना पाहणी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये उन्हाळ्यात विषबाधा होण्याचे प्रमाण अधिक असते.