दोन नंबरचे धंदेवाले; मंत्री गिरीश महाजनांचा एकनाथ शिंदेंच्या आमदारावर थेट वार

Girish Mahajan : विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटण वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे.

  • Written By: Published:
Girish Mahajan On Kishor Patil

Girish Mahajan On Kishor Patil : राज्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडलीय. अनेक नगरपालिकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशा लढती होत आहे. त्यात एकमेंकावर थेट आरोप प्रत्यारोप होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधुंमध्ये जुंपली आहेत. तर भाजपचे मंत्री व आमदारही शिंदे गटाच्या आमदारांवर थेट हल्ला चढवत आहे. जलसंपदा मंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आमदारांवर थेट टक्केवारी, दोन नंबरचे धंदेवाले उमेदवार दिलेत, असे आरोप केले आहे.


बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करण्याचे सरकारचे आदेश; हे शहरे रडारवर !


दारु-मटण वाटणारे उमेदवार शोधले

जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपालिकेमध्ये महायुती फुटली आहे. भाजप व शिंदेसेनेने आपले स्वतंत्र पॅनल दिले आहेत. त्यात आता थेट एकमेंकावर टीका केली जात आहे. एका प्रचार सभेत बोलताना गिरीश महाजन यांनी शिंदे यांचे आमदार किशोर पाटील ( Kishor Patil) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाजन म्हणाले, भडगावची परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यातील नगरपरिषदांपेक्षा सर्वात खराब आहे. विरोधकांनी “दोन नंबरचे धंदेवाले” पुढे आणले आहेत. विरोधकांनी पैसेवाले, दारू-मटण वाटणारे आणि दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित लोकांना उमेदवारी दिली आहे. अशा लोकांच्या हाती शहराचे नेतृत्व देणे धोक्याचे आहे. ( Girish Mahajan On mla Kishor Patil bhadgaon nagarpaika election jalgaon)


रवींद्र चव्हाणांसोबतच्या संबंधामुळे मला टार्गेट केलं जातंय – विजय केनवडेकर

भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार
जामनेर, चाळीसगावमध्ये विकासकामे बघा. ते शहरी किती पुढे गेले आहे. भडगावची अवस्था काय आहे. भडगावमध्ये टक्केवारीचे व्यवहार आणि अकार्यक्षमता सुरू आहे. शहराचा निर्णय आता जनतेने बदलाच्या दिशेने घ्यावा. भडगाव दोन नंबरचे शहर म्हटलं जाते. विरोधकांची उमेदवारांची यादी पाहिले. सर्वच दोन नंबरचे घेतले आहे. एखादा दुसरा घेतला जातो. येथे असं कसं होऊ शकतं. सगळे दोन नंबरचे उमेदवार दिले आहेत. शहर गहाण ठेवायचे की विकून टाकायचे आहे, अशी टीका महाजन यांनी केलीय.

follow us