‘सरकारने लोकांचा अंत पाहू नये..,’; अमानुष मारहाण प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा इशारा

‘सरकारने लोकांचा अंत पाहू नये..,’; अमानुष मारहाण प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा इशारा

अहमदनगरमधील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगावात चार मागासवर्गीय तरुणांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शेळी आणि कबुतरे चोरल्याच्या संशयावरुन तरुणांना झाडाला उलटं टांगून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीयं. या घटनेनंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळत असून या प्रकरणावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) सरकारला थेट इशाराच दिला आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचं तापमान किती? विक्रम लँडरने दिलं उत्तर

प्रकाश आंबेडकर म्हणाले, समाजव्यवस्थेमधील मराठा समाज बदलतो आहे, यामध्ये दुमत नाही पण त्यातले काही लोकं बदलत नाहीत, त्यांना हाताशी धरुन असं कृत्य करायला लावण्यात आल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच अशा घटना वारंवार घडत आहेत, अशा घटनांमुळे अनेकजण चिंतेत आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार असल्याचा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला आहे.

भ्रष्ट कर्मचाऱ्याला विद्यार्थ्याकडून लाच घेतांना अभाविपने रंगेहात पकडले, सावित्रीबाई फुले विद्यापीठातला प्रकार

तसेच हा कोणतरही रचनात्मक कार्यक्रम केला असून या घटनेची आम्ही निंदा करीत आहोत. दोन जणांनी तिकडं चाललंय काय हे पाहायला गेल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. सखोल चौकशी नाही झाली तर याचे गंभीर दुष्पपरिणाम होतील, लोकांचा अंत सरकारने पाहु नये, लोकांचा उद्रेक आम्ही राखून ठेवलायं, तो आम्ही बाहेर पडू देत नाही, या प्रकरणी शासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी आंबेडकर यांनी केली आहे.

शिवराज सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारः दोन महिन्यांसाठी तीन मंत्री

नेमकं काय घडलं?
मागासवर्गीय तरुणांवर बकऱ्या आणि कबुतरे चोरल्याचा संशय होता. त्यानंतर सहाही आरोपींनी या तरुणांना घरातून उचलून नेत गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले. तिथे कपडे काढून त्यांना अर्धनग्न केले. काही जणांनी दोरीने त्यांचे पाय बांधले, तर इतरांनी झाडाला उलटं लटकवत अत्यंत क्रुरपणे मारहाण केली, असे पीडित तरुणांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. या मारहाणीत शुभम वाघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड, खंडागळे हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांना शिरापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री पीडितांना भेटीसाठी गेले होते, या प्रकरणात फक्त कामगाराला पकडण्यात आलं आहे, ज्यांनी मारहाण केली आहे, त्यांना अद्याप पकडलेलं नाही, जर प्रशासन आरोपींना पकडू शकलं नाहीतर पालकमंत्री गेलेच कशासाठी? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube