विजयाचा जल्लोष…खडसेंनी कार्यकर्त्यांसोबत धरला ‘ठेका’
Jalgoan Market Committee Election Result : सध्या राज्यात अनेक ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. अनेक ठिकणी निकाल देखील जाहीर झाले आहे. यातच बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्येष्ठ नेते तसेच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी एक हाती सत्ता काबीज केली. निवडणुकीतील विजयाचा आनंद एकनाथ खडसे यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत साजरा केला. यावेळी खडसे यांनी थेट कार्यकर्त्यांसोबतच डीजेच्या तालावर ठेका धरल्याचे दिसले.
जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समिती पैकी आज दुसऱ्या टप्प्यात सहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर होणार आहे. बोदवड, अमळनेर, पाचोरा, यावल, धरणगाव, जळगाव, या कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल आज लागणार आहे. यात महत्वाचे व जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बोदवड बाजार समिती 25 वर्षापासून एकनाथ खडसेंच्या ताब्यात आहे त्यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत.
विजयाचा जल्लोष…खडसेंनी कार्यकर्त्यांसोबत धरला ‘ठेका’@EknathGKhadse @Rohini_khadse #EknathKhadse #MarketcommitteeElection pic.twitter.com/WOBWAvY0mr
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) April 30, 2023
अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक एकनाथ खडसे यांच्या पॅनलने एकहाती जिंकली आहे. बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आलेला आहे. 18 जागांपैकी 17 जागेवर खडसे गटाने विजय मिळवला आहे.
Uday Samant : शरद पवार राज्याचे ज्येष्ठ नेते, बारसू रिफायनरी प्रकरणात मध्यस्थी करावी
विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता एकनाथ खडसे यांनी अबाधित राखलेली आहे. या निवडणुकीतही एकहाती सत्ता मिळाल्यानंतर खडसे समर्थकांनी जल्लोष साजरा केला. यावेळी एकनाथ खडसे आणि खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. खडसेंच्या कार्यकर्त्यांची यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.