घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, कोपरगावकर आम्हाला साथ देतील, आशुतोष काळेंना विश्वास
प्रचार सभेत बोलतना काळे म्हणाले, कोपरगाव शहराच्या विकासासाठी २०१९ ला निवडून आल्यापासून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे.
चाळीस वर्ष सत्ता असतांना कोपरगाव शहराचा विकास (Election) करता आला नाही, कोपरगावच्या नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड यातना भोगाव्या लागल्या ते आज निवडणुकीच्या तोंडावर कोपरगावच्या नागरीकांना विकासाचे खोटे स्वप्न दाखवत आहेत असा थेट घणाघात आशुतोष काळे यांनी केला आहे.
ज्यांना सत्ता असतांना विकास करता आला नाही त्यांना निवडणुका आल्यावरच विकासाचा पुळका येतो. त्यामुळे त्यांच्या खोट्या आश्वासनाला व भूलथापांना बळी पडू नका आणि येणाऱ्या दोन तारखेला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या प्रचारार्थ कोपरा सभेत नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
कोपरगावमधील रस्ता, पुलासाठी 27 कोटी रुपयांचा निधी; आमदार आशुतोष काळे यांची माहिती
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहराच्या विकासासाठी २०१९ ला निवडून आल्यापासून कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही कोपरगाव शहराच्या विकासाची गंगा अविरतपणे वाहत राहण्यासाठी कोपरगाव शहराच्या विकासासाठी काम करणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्या. कोपरगाव शहराच्या २८ विकासकामांना न्यायालयातून स्थगिती आणणाऱ्या आणि विकासाला विरोध करणाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता देवू नका. ५ नं. तळ्याचे काम पूर्ण झाले आणि शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
चाळीस वर्ष सत्ता हातात असून पण त्यांनी काही केले नाही. कोपरगावचा विकास न होऊ देण्याची वृत्ती विरोधाकांची असल्याने शहरातील अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. हे प्रश्न आपल्याला कायमचे संपवायचे असल्याचे आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले की, विरोधकांचे फटाके फूस झाले असून विरोधकांनी घेतलेल्या सभेमध्ये त्यांच्याच प्रमुख पाहुण्यांनी त्यांना सुनावले आहे. आका, काका आणि दादा आम्ही तिघेजण कोपरगावाचा विकास करणार आहे.
घार फिरते आकाशी चित्त मात्र पिला पाशी, अशी माझी अवस्था झाली होती म्हणून मी उमेदवारी करीत आहे. विकास हा एकच ध्यास आणि एक ध्येय ठेऊन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे.आ. आशुतोष काळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मला कोपरगावचा शहराला विकासाच्या बाबतीत अव्वल करायचे असल्याचे काका कोयटे यांनी सांगितले.
