उत्कर्षा रुपवतेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 4 मे ला संविधान निर्धार सभेत कोणावर डागणार तोफ?

उत्कर्षा रुपवतेंसाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; 4 मे ला संविधान निर्धार सभेत कोणावर डागणार तोफ?

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील (Shirdi Loksabha Election )वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate)यांनी देखील प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर (shrirampur)येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi)नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Ayushmann Khurrana : आयुष्मानच्या ‘हॅपी लाईफ’चं रहस्य काय? अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा…

शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी प्रचारसभेचे शनिवार दि. 4 मे रोजी मिनी स्टेडियम, कोर्ट रोड, श्रीरामपूर येथे दुपारी 12 वाजता आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे.

चंद्रहार पाटलांना नवखा म्हणणाऱ्यांना पवारांच उत्तर! म्हणाले, सांगलीला पैलवान खासदार होता

उत्कर्षा रुपवते यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रचारामध्ये चागंलीच आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच नागरिकांचा देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहेय. उत्कर्षां रुपवते यांना, काँग्रेसचे निष्ठावंत माजी मंत्री स्व. दादासाहेब रुपवते आणि विधानसभेचे माजी सभापती स्व. मधुकरराव चौधरी यांची नात व वडील बहुजन शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. प्रेमानंद रुपवते असा मोठा राजकीय वारसा आहे.

महाविकास आघाडीतून सुरुवातीपासूनच उत्कर्षा रुपवते या शिर्डी लोकसभेसाठी इच्छूक होत्या मात्र शिर्डी लोकसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली. शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उत्कर्षा रुपवते या नाराज होत्या. रुपवते यांना उमेदवारी नाकारल्याने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील त्यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली अन् त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली.

यापूर्वी प्रेमानंद रुपवते यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी उत्कर्षां रुपवते यांनी गेल्या दोन वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. शिर्डीचे वातावरण पूरक असल्याने कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवायची असा चंग त्यांच्या समर्थकांनी बांधला होता. रुपवते यांनी वंचितह्णकडून निवडणूक लढवल्यास शिर्डीची निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की!

आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात 4 मे रोजी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे. श्रीरामपूरमध्ये आयोजित संविधान निर्धार सभेमध्ये अॅड.प्रकाश आंबेडकर हे कोणावर तोफ डागणार? हे पाहावं लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube