तर विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून रोहित पवारांनाच बसवावं लागलं असतं; सुजय विखेंचा खोचक टोला

तर विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून रोहित पवारांनाच बसवावं लागलं असतं; सुजय विखेंचा खोचक टोला

Sujay Vikhe on Rohit Pawar : राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे पार पडले. यावेळी अनेक प्रशनोत्तर झाले. अधिवेशनात युवा आमदारांना जास्त बोलण्याची संधी दिली जात नाही अशी नाराजी आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात सर्वात जास्त ते स्वतः आमदार पवार हेच बोलले. अजून जास्त बोलले असते तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या जागी त्यांनाच बसवावे लागले असते, असा खोचक टोला यावेळी खासदार सुजय विखे यांनी लगावला.

जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट

नगर येथील रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पावसाळी अधिवेशनावरून कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली.

अधिवेशनात युवा आमदारांना बोलू दिले जात नाही, तसेच युवा आमदारांचे अनेक प्रश्न त्यांना मांडू दिले जात नाही, यासाठी युवा आमदारांची संख्या वाढली पाहिजे असे रोहित पवार म्हणाले होते. यावर बोलताना खासदार विखे म्हणाले, यंदाच्या अधिवेशनात सर्वात जास्त ते स्वतः आमदार पवार हेच बोलले. अजून जास्त बोलले असते तर विधानसभेच्या अध्यक्षांच्या जागी त्यांनाच बसवावे लागले असते. त्यांनी यंदा जेवढे माध्यमांचे लक्ष वेधले तेवढे तर कोणालाही जमले नाही. असे असले तरी याठिकाणी प्रत्येकाला आपला प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे.

अमितभाईंच्या मनातलं काम महाराष्ट्रात करून दाखवणारच!; फडणवीसांनी अजितदादांसमोरच दिला शब्द

तसेच युवा आमदार झाले पाहिजे यावर मी काही बोलणार नाही. हे सगळं वैचारिक आहे. जनता प्रत्येकाला संधी देते निवडून आणते मात्र तो प्रतिनिधी कसा कार्य करतो त्यानुसार जनता त्याला संधी द्यायची कि नाही हे ठरवते, अशा शब्दात खासदार सुजय विखे यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube