पाच नव्या आमदारांची एन्ट्री तर, पाच विद्यमान झाले माजी.. नगरचं राजकारण बदललं
Election Results 2024 : राज्यात यंदा महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकत सरस कामगिरी केली. महाविकास आघडीची पुरती (MVA) दाणादाण उडाली. या आघाडीला 50 जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत. विदर्भ असो की मराठवाडा, कोकण असो की पश्चिम महाराष्ट्र सगळीकडेच महायुतीने मुसंडी मारली. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा सुद्धा याला अपवाद नाही.
2019 मधील निवडणुकीत जशी परिस्थिती होती त्याच्या अगदी उलट कौल यंदा जनतेनं दिला आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीत केलेली (Lok Sabha Elections 2024) कामगिरी विधानसभेच्या निवडणुकीत करता आली नाही. श्रीरामपूर आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ वगळता बाकीच्या 10 मतदारसंघात महाविकास आघाडीचं पानिपत झालं. भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने चमकदार कामगिरी केली. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त एकच माजी आमदार विद्यमान आमदार झाले आहेत. तर पाच विद्यमान आमदार माजी आमदार झाले आहेत. तसेच पाच माजी आमदार माजीच राहिले आहेत.
राहुरी नगर मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहण्यास मिळाली. या मतदारसंघात शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि भाजप उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्यात सरळ लढत होती. या लढतीत कर्डिले यांनी बाजी मारली. मागील 2019 मधील निवडणुकीत तनपुरे यांनीच कर्डिले यांचा पराभव केला होता. पण यावेळी कर्डीलेंनी प्रचारापासून सर्वच बाबतीत आघाडी घेतली होती. या विजयाबरोबरच शिवाजीराव कर्डिले पुन्हा आजी झाले आहेत.
”तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् ठाकरेंनी शब्द फिरवला”; रविकांत तुपकरांचा मोठा गौप्यस्फोट
पाच आमदार झाले माजी
नगर जिल्ह्यातील निवडणुकीत पराभूत होऊन आता चारजण माजी झाले आहेत. यातील चार जण तर आता माजी मंत्री सुद्धा झाले आहेत. तर एकजण निवडणूक न लढवता माजी झाले आहेत. बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, लहू कानडे आणि शंकरराव गडाख पराभूत होऊन माजी आमदार झाले आहेत. यातील थोरात, गडाख, तनपुरे हे तिघे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिले आहेत.
श्रीगोंदे मतदारसंघात यंदा बबनराव पाचपुते निवडणूक लढले नाहीत. मागील टर्ममध्ये ते आमदार होते. त्यामुळे निवडणूक न लढताच ते माजी झाले आहेत. या मतदारसंघात त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
सहा माजी पुन्हा माजीच
नगर जिल्ह्यात यंदा सहा माजी आमदार रिंगणात होते. अर्थात त्यांनी बंडखोरीच केली होती. पण त्यांचा हा डाव यशस्वी ठरला नाही. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात चंद्रशेखर घुले, अकोलेमध्ये वैभव पिचड, श्रीगोंद्यात राहुल जगताप, नेवासा मतदारसंघात बाळासाहेब मुरकुटे, श्रीरामपूर मध्ये भाऊसाहेब कांबळे आणि पारनेरमध्ये विजय औटी या माजी आमदारांनी नशीब अजमावून पाहिलं पण त्यांना मतदारांचा कौल काही मिळाला नाही. यामध्ये बाळासाहेब मुरकुटेच फक्त असे होते ज्यांना प्रहार पक्षाकडून तिकीट मिळालं होतं.
अजितदादांनी उगाच भाजपला पाठिंबा दिला नाही; ‘या’ तीन मुद्द्यांत दडलंय मोठं पॉलिटिक्स
आजी राहिले आजी, पाच नवे चेहरेही मिळाले
शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव पाथर्डीत मोनिका राजळे, अकोलेमध्ये किरण लहामटे, नगर शहरात संग्राम जगताप, कोपरगावमध्ये आशुतोष काळे आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार या आमदारांनी पुन्हा बाजी मारली. या पाच नेत्यांनी मागील निवडणुकीतही विजय मिळवला होता. त्यामुळे हे पाच आजी पुन्हा आजीच राहिले आहेत. तसेच संगमनेरमध्ये अमोल खताळ, श्रीगोंद्यात विक्रम पाचपुते, नेवाश्यात विठ्ठलराव लंघे, श्रीरामपुरात हेमंत ओगले, पारनेरमध्ये काशिनाथ दाते हे पाच नवे आमदार नगर जिल्ह्याला मिळाले आहेत.