भुजबळांना भिडण्याच्या नादात जरांगेंचा संयम सुटला; ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करण्याची धमकी
Maratha Reservation : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी आम्ही प्रदीर्घ लढा दिला यासाठी आम्ही खूप मोठे बलिदान देखील केले. असून यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला आहे. मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना आमच्याच समाजाच्या अन्नमध्ये विष कालवायचे असेल तर आम्हाला देखील नाईलाज असतो. ओबीसींचे देशातील 27% आरक्षणाला चॅलेंज करावा लागेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
Lagna Kallol: मयुरी नक्की कोणासोबत संसार थाटणार, ‘लग्न कल्लोळ’चा धमाकेदार टिझर रिलीज!
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे जरांगे यांनी पदयात्रा काढली होती. त्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या. मात्र आता त्यानंतर ओबीसीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसीचा महाएल्गार मेळावा अहमदनगर येथे 3 फेब्रुवारी पार पडणार आहे. त्यापूर्वीच मनोज जरांगे यांनी हा इशारा दिल्याने आता पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
Pushkar Jog : दादागिरीची भाषा करणारा ‘पुष्कर’ नरमला; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर मागितली माफी
मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना जरांगे म्हणाले की, मोठ्या संघर्षाने मराठ्यांना हे आरक्षण मिळाले आहे. ही प्रदीर्घ काळाची लढाई आहे. मात्र जर आमच्या पोरांच्या अन्न विष घालवण्याचे काम त्यांनी केलं. आम्ही देखील ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करू.
“आमच्याकडे ‘मित्र’ वाढल्याने अडचण” महाजनांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, गिरीशभाऊ तुम्हीच…
ओबीसी नेत्यांकडून आता यात्रा काढण्यात येणार आहे. यावरती बोलताना जरांगे म्हणाले की, त्यांनी यात्रा काढावी. नाहीतर जत्रा भरावी. त्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. ते ओबीसी बांधवांनी भुजबळ यांना समजून सांगावं. आम्हाला ओबीसी बांधवांचे वाटोळे करायचे नाही. आम्हाला तुमच्या अन्नात माती कालवायचे नाही. तर छगन भुजबळ यांनी देखील आमच्या अंगात माती कालवायची नाही. ओबीसी समाजाचे वाटोळे हे फक्त भुजबळ यांच्यामुळेच होईल ओबीसी ने देखील हे समजून घेतले पाहिजे.
नाईलाज स्तव मला ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज करावं लागणार आहे. त्यांचा अहवाल देखील स्वीकारलेला नाही. आम्हाला ते सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे लागणार आहे. त्यांच्या देशातील 27% आरक्षण रद्द होऊ शकते. याला कारण फक्त छगन भुजबळ हेच असतील. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. आमचे हे हक्काचं आरक्षण आहे. त्यांनी लक्षात घ्यावं असं देखील यावेळी बोलताना जरांगे म्हणाले.