“आमच्याकडे ‘मित्र’ वाढल्याने अडचण” महाजनांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, गिरीशभाऊ तुम्हीच…

“आमच्याकडे ‘मित्र’ वाढल्याने अडचण” महाजनांच्या नाराजीवर फडणवीस म्हणाले, गिरीशभाऊ तुम्हीच…

Girish Mahajan : राज्य सरकार अडचणीत सापडले की आधी धावून जातात ते गिरीश महाजन. कोणतंही राजकीय संकट आलं की ते संकट परतवून लावण्यात त्यांची (Girish Mahajan) हुशारी नेहमीच कामी येते. मराठा आरक्षण आंदोलनातही (Maratha Reservation) सरकारच्या बाजूने महाजन बाजू मांडतच होते. त्यामुळेच संकटमोचक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. मात्र हेच संकटमोचक गिरीश महाजन नाराज असल्याचे आता एका प्रसंगातून दिसून आले आहे. नागपुरात (Nagpur News) काल खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याच महोत्सवात महाजन यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. (bjp-minister-girish-mahajan-expressed-displeasure-in-front-of-devendra-fadnavis)

बावनकुळेंकडून कोंडी, रविंद्र चव्हाणांचा हस्तक्षेप : निलेश राणेंच्या निवृत्त नाट्याची पडद्यामागील स्टोरी

महाजन म्हणाले, माझ्याकडे तीन सेक्रेटरी आहेत. त्यामुळे कसं काम करावं हेच मला कळत नाही. तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. अडचणीही आहेत. आणखी सात आठ महिने खातं माझ्याकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल. आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की मग खाते बदलतात. त्यांच्या डिमांडप्रमाणे खाते बदलतात. त्यामुळे मोठी अडचण झाली आहे. इकॉनॉमी नाही तर रोजगार देणारी संस्था म्हणून पर्यटन विभागाकडे पाहिले पाहिजे, असे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

गिरीशभाऊ चिंता नको, तुम्हीच कायमस्वरुपी पर्यटनमंत्री : फडणवीस 

यानंतर देवेंद्र फडणवीसांचं भाषण झालं. त्यांनीही महाजन यांना आश्वस्त केलं. गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका. पुढल्या काळात तुमच्या खानदेशात नितीनजी हा कार्यक्रम घेतील. तुम्ही सांगितलं पर्यटन मंत्र्यांचं पर्यटन रोखा ते आम्ही केलं आहे. त्यामुळे तुम्हीच कायमस्वरुपी पर्यटनमंत्री आहात. त्यामुळे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात जिथे वाटेल तिथे पर्यटन वाढवा आम्ही पाठिंबा देऊ. नितीनजींनी तुम्हाला पर्यटनातल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे आश्वासक उत्तर फडणवीस यांनी दिले.

जाहिरात नाट्य : भाजपची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना नेत्यांची ऊर फुटेपर्यंत धावाधाव अन् दमछाक

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज