कूपनची झेरॉक्स दिली, भर उन्हात थांबवलं, पण साखर नाही भेटली; विखेंविरोधात संताप

कूपनची झेरॉक्स दिली, भर उन्हात थांबवलं, पण साखर नाही भेटली; विखेंविरोधात संताप

Sujay Vikhe Patil : मागील काही दिवसांपासून राज्यासह अहमदनगरन जिल्ह्यातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच आता अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यात खासदार सुजय विखेंविरोधात वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखेंनी (Sujay Vikhe Patil) साखर वाटपाची घोषणा केली. त्यानंतर अनेक ठिकाणी साखर वाटप करण्यात आली. मात्र, शेवगावात आज महिलांकडून रेशन कार्डची (कूपन) झेरॉक्स घेतल्यानंतर महिलांना भर उन्हात थांबवण्यात आलं. उन्हात थांबवूनही अखेर साखर न मिळाल्याने महिलांकडून विखेंविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झालायं.

इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, तिने थेट घरच सोडले अन् पोहचली परराज्यात

काही दिवसांपूर्वीच खासदार विखे यांच्या साखर वाटपावरुन ठाकरे गटाचे नेते विक्रम राठोड यांनी विखेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा सुजय विखे यांना चांगलच ट्रोल करण्यात आलं होतं, त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखे प्रकाशझोतात आले आहेत. आताही महिलांना साखर न मिळाल्याच्या प्रकरणावरुन त्यांना ट्रोल करण्यात येत आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी पाच किलो साखर वाटप सुरु करण्यात आले आहे. खा.डॉ.सुजय विखे यांच्या पुढाकारातून साखर वाटप होत आहे. मात्र, साखर वाटपावरुन गावागावात वाद निर्माण होताना पाहायला मिळत आहे. साखर न मिळालेल्या संतप्त ग्रामस्थांचे व्हिडिओच सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रियाही देण्यात येत आहे.

‘उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर अजितदादांनाही सोबत घेतलं नसतं’; तावडेंचा खळबळजनक दावा

सुजय विखे यांचा शेवगाव तालुक्यात साखर वाटपाचा कार्यक्रम होता. मात्र, तालुक्यातील बोधेगाव येथे दिवसभर थांबूनही अनेकांना साखर मिळाली नाही. त्यामुळे महिलांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. साखर द्यायचीच नव्हती तर रेशनकार्डच्या झेरॉक्स घेवून उन्हातान्हात उभे का केले, असा सवाल महिला करीत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

Meenakshi Seshadri | ‘हिरो’ चित्रपटाचे 40 वर्ष; मीनाक्षी शेषाद्रीने दिला आठवणींना उजाळा | LetsUpp

दरम्यान, भाजपच्या आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी शेवगाव तालुक्यात जो साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी काही सर्वसामान्य गरीब लोकांना साखर मिळाली नाही. त्यांनी 200 रुपयांच्या साखरेसाठी दिवसभर उन्हात उभा राहूनही त्यांना साखर न मिळाल्याने महिला संतापल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube