पुरग्रस्तांसोबत अरेरावी केली का?; फडणवीसांसाठी बावनकुळे मैदानात

  • Written By: Published:
पुरग्रस्तांसोबत अरेरावी केली का?; फडणवीसांसाठी बावनकुळे मैदानात

नाशिक : नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे (Nagpur Rain) शहरातील विविध भागात पावासाचे पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadanvis) शहरातील विविध भागांची पाहणी करण्यात आली. यावेळी एका ठिकाणी फडणवीस पुरग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्याला अरेरावी करत ओढत असल्याचे दिसून आले हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता फडणवीसांची बाजू घेत भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) मैदानात उतरले आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. (Chandrashekhar Bawnkule On DCM Nagpur Rain Video)

शिंदे-ठाकरेंची धाकधूक वाढली! आमदार अपात्रतेप्रकरणी आजपासून सुनावणीची सुरुवात

नागपुरमधील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही खोडकर लोकांनी विपर्यास केला असून, जनतेमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आदर आहे. मागच्या दहा वर्षात जे नागपूर बदललं, ते कधीच बदललेले नाही. ज्यांनी नागपूर करता एक रुपयाचा विकास केला नाही, ते आता या व्हिडिओचा आधार घेत बोलत आहेत.

फडणवीसांनी पुरग्रस्तांसोबत आरेरावी केलेली नाही, तर, पावसाच्या फटका बसलेल्या सर्वांना ते घरी घेऊन गेले. तसेच त्यांच्या घरांची झालेली पाहणी फडणवीसांनी केली. कष्टानं उभ्या केलेल्या घरांचं नुकसान झाल्यानंतर आक्रोश होणं साहजिक असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर न्या : विरोधातील बातम्या टाळण्यासाठी बावळकुळेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

ताकद देणे आमची जबाबदारी

महाविजय 2024 मध्ये 45+ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट असल्याचा विश्वासही बावनकुळेंनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच कुठली शिट कुणाला द्यायची, यावर पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीतील 11 घटक पक्ष ताकदीने लढू तसेच एकमेकांना मदत करू. जी जागा ज्या पक्षाला मिळेल, त्यांना ताकद देणे ही आमची जबाबदारी असल्याचेही यावेळी बावनकुळे म्हणाले.

‘अर्थमंत्रीपद राहिल की नाही?’ अजितदादांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…

कल्याण-डोंबिवली जागा

रोहित पवार पहिल्या टर्ममध्ये आले आहे. आम्हाला चार चार टर्म झाल्या असून, ते दिवसा स्वप्न बघत असल्याची बोचरी टीका बावनकुळेंनी यावेळी रोहित पवारांवर केली. श्रीकांत शिंदे प्रभावी खासदार असल्याचेही ते म्हणाले. पवार आणि अदानी यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे त्यांनी अदानींची भेट घेतली असेल. मात्र, उदयनिधी यांनी दोनदा तीनदा हिंदू धर्माबाबत विधान केले आहे. या विधानाला शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी उदयननिधी यांचे विधान मान्य असल्याचे सांगावे आणि मान्य नसेल, तर इंडिया आघाडी सोडावी. हिंदू संस्कृतीला संपवण्याची भाषा करणाऱ्या लोकांसोबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे असून, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर पवार आणि ठाकरे यांनी द्यावे अशी मागणीही यावेळी बावनकुळेंनी केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube