Video : मोदींच्या नाशकातील सभेत कांद्याने केला वांदा; भाषणादरम्यान पवारांच्या नावाच्या घोषणा अन्…
Nashik Lok Sabha Modi campaign meeting : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा जोरदार प्रचार सुरू आहे. आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सभेला संबोधित करत असातनाचं शरद पवारांच्या नावने घोषणा देत कांदा विषयावर बोल असं शेतकरी म्हणत होता. (Onion farmers) त्याने जोराजोरात घोषणा दिल्याने मोदींना आपलं भाषण थांबवाव लागलं. (Nashik Lok Sabha) त्यानंतर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं. दरम्यान, जय श्रीराम, भारत माता की जय अशा घोषणा देत उपस्थितांना शांत करण्याचा मोदींचा प्रयत्न. नाशिक लोकसभेचे महायुती शिंदे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभेच्या भाजपच्या लोकसभा उमेदवार भारती पवार याच्या प्रचारार्थ ही सभा झाली.
संशयकल्लोळ थांबवा अन् गोडसेंना निवडून द्या; छगन भुजबळांची नाशिककरांना साद
कांदा उत्पादकांमध्ये नाराजी
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमध्ये ही सभा झाली. कल्याण, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे. दिंडोरी मतदरासंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा होती.
एका फतव्यावर विरोधकांचं 90 टक्के मतदान, मोदींसाठी सुस्ती सोडा! महाजनांची साद
शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवलं
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या येथील पाच शिवसैनिकांना निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवलं होतं. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध कांदा उत्पादक संघटना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवलं जात आहे. मोदींच्या सभेत कोणता गोंधळ नको म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती.
मोदींच्या सभेत नेमकं काय घडलं?
पंतप्रधान सबेत बोलत असताना अचान “मोदीजी आता कांद्यावर बोला” अशी घोषणाबाजी सुरु झाली. कारण, नेहमीप्रमाणं मोदी इंडिया आघाडी, काँग्रेस, राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यावर बोलत होते. त्याचबरोबर अल्पसंख्यांच्या मुद्द्यावर ते बोलत होते. मात्र, अचानक प्रेक्षकांमधून घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर लक्ष विचलित झाल्यानंतर मोदी काही काळ थांबले. मोदी थांबल्यानंतर प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुळबूळ निर्माण झाली. दरम्यान, मोदी समर्थकांनी मोदी-मोदी अशी घोषणाबाजी सुरु केली.