एका फतव्यावर विरोधकांचं 90 टक्के मतदान, मोदींसाठी सुस्ती सोडा! महाजनांची साद

एका फतव्यावर विरोधकांचं 90 टक्के मतदान, मोदींसाठी सुस्ती सोडा! महाजनांची साद

Girish Mahajan : एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी नाशिकच्या मतदारांना साद घातलीयं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) चौथ्या टप्प्यानंतर पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) उपस्थितीत आज नाशिकच्या पिंपळगावात महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पवार-विखेंच्या घरात जन्मलो नाही म्हणून माझं कुटुंब उद्ध्वस्त… वाडेश्वर कट्ट्यावर धंगेकरांचे गौप्यस्फोट

गिरीश महाजन म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही कोणत्याही जाती-पातीची, धर्माची किंवा व्यक्तीची नाही तर ही निवडणूक स्वाभिमानाची आहे. देशात काही लोकं आहेत, काही समाज आहेत, त्यांनी एक फतवा काढला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होत आहे, पण आपण सुस्त आहोत. कोणी शेताकडे जातो, कोणी जिल्ह्याकडे तर कोणी घरी, पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी सुस्ती सोडा अन् 85 ते 90 टक्के मतदान करा, नाही तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं गिरीश महाजनांनी जाहीर सभेत स्पष्ट केलंय.

तुम्ही तुमचा आकडा बघा, सुपडाचं साफ होणार; बावनकुळेंनी चव्हाणांना सुनावलं!

तसेच लोकांनी आपल्या घरातील सदस्य जे बाहेर गेलेले आहेत, मग त्यात कोणाची मुलगी, मुलगा कोणीही असो त्यांना आजच फोन करुन बोलावून घ्या. दुसरीकडे लोकं दुबईहून 50 हजार रुपये खर्च करुन मतदान करण्यासाठी येत आहे. कोणी दुबईतून, मलेशियातून, तर सिंगापूरहून येत आहे. कारण त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची अॅलर्जी आहे. पण आपल्यासमोर मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही, असं गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय.

Loksabha Election : 400 पार सोडाच भाजप 250 च्या आतच! योगेंद्र यादवांचा मोठा दावा….

आधीच्या काळात जगातील अनेक देश आपल्याकडे तिरक्या नजरेने पाहत होते. पाकिस्तान, चीन सारखे देश भारताला धमक्या देत असत. पाकिस्तानसारख्या देशात सुई बनत नाही तो देश भारतात येऊन हल्ले करत असायचा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीट का जवाब पत्थरने दिलायं, असंही महाजन म्हणाले आहेत.

दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघासाठी येत्या 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. एकीकडे महायुतीची सभा तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही जाहीर सभा घेतल्या जात आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजाभाऊ वाजे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube