Nashik News : प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेची जात वेगळी; तब्बल 8 वेळा गर्भपात, महाजन कुटुंबावर गुन्हा!

नाशिकमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेची जात वेगळी असल्याच्या कारणावरून तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आलीयं.

Untitle (28)

Nashik News : ‘तू आमच्या जातीची नाहीस’ म्हणत प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून अमानुषपणे छळ केल्याची घटना नाशिकच्या म्हसरुळमध्ये घडलीयं. या विवाहितेचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलायं. या प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांविरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई; गरीबनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक, 15 जण अटकेत

पीडित महिलेचा विजय दशरथ महाजन याच्याशी प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर सुरुवातीच्या काळात महिलेला सर्व काही सुरळीत वाटत होतं. काही काळानंतर पती पत्नी पुण्यात नोकरीनिमित्त गेले होते. नौकरी गेल्यानंतर 2025 मध्ये दोघेही मूळ गावी नाशिकला आले.

नाशिकला आल्यानंतर पीडित महिलेचा सासरच्या मंडळींसह पतीकडून अमानुष छळ करण्यात आला. पतीने स्वत:चे घर खरेदी करण्याचं कारण सांगून तिच्याकडील सोने-चांदीचे दागिने मोडून पैसे हडप केले. तसेच माहेरुन पैसे आणि हुंडा आणण्यासाठी तिचा छळ केला.

वांद्रे अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा तणाव; नागरिकांकडून दगडफेक, पोलिसांकडून धरपकड

पीडित महिलेचा जात वेगळी असल्यानेच तिच्या सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आलायं. तू आमच्या जातीची नाहीत, तुझ्या मुलांना आम्ही स्विकारणार नाही, या शब्दांत पीडितेला सासरच्या लोकांनी टोमणे मारले असून आत्तापर्यंत तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचं महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान,पीडित महिलेच्या तक्रारीवरुन म्हसरुळ पोलिसांनी विजय दशरथ महाजन, निर्मला दशरथ महाजन, दशरथ तुकाराम महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

follow us