कर्जत ‘एमआयडीसी’ची लढाई रस्त्यावर; शिंदेंच्या होम ग्राउंडमध्येच राष्ट्रवादीचा रास्तारोको!
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत येथील रखडलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नावर आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात विधीमंडळत सुरू असलेली लढाई आता रस्त्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आमदार शिंदे यांना खिंडीत गाठण्याचा प्लॅन नक्की केला असून शिंदे यांच्या होम ग्राउंड अर्थात कर्जतमध्ये ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करणार आहेत.
कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी होत नाही यामागे राम शिंदे आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. त्यावर शिंदे म्हणाले, यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. 25 वर्षांपूर्वीच येथे एमआयडीसी मंजूर करण्यात आली आहे. 25 वर्षांच्या इतिहासात मी देखील प्रयत्न केले परंतु, तेथे उद्योग काही आले नाहीत. तुमचं देखील सरकार (महाविकास आघाडी) होतं. कर्जत आणि जामखेड हे मतदारसंघातील दोन तालुके आहेत. तिथे का उद्योग नाही आणले? तिथे का नाही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला? असे सवाल त्यांनी केले.
कर्जत MIDC चा वाद चिघळला! शिंदेंनी रोहित पवारांकडे मागितला कर्जत-जामखेडचा हिशोब
एमआयडीसी मुद्द्यावरून रोहित पवार आक्रमक
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून कर्जत येथे एमआयडीसीला मंजुरी मिळावी यासाठी चांगलेच आक्रमक झाले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात भर पावसात आंदोलन केले होते. त्यानंतर हा मुद्दा बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत दिल्यांनतर रोहित पवार यांनी आंदोलन स्थगित केले होते.
सामंतांनी आणला ट्विस्ट
मंत्री सामंत यांनी आश्वासन दिल्यानंतरही बैठक काही झालीच नाही. मात्र, त्यांच्या एका वक्तव्याने एमआयडीसीच्या राजकीय वादात नवाच ट्विस्ट आणला. रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना राम शिंदे यात राजकारण करत असून मला श्रेय मिळू नये म्हणून हे काम करत असल्याचे म्हटले होते. त्यावर उदय सामंतांनी राम शिंदे यांनी मंत्री असतानाच मुख्यमंत्र्यांना एमआयडीसीसाठी पत्र लिहिले होते व त्यासंदर्भात ते पाठपुरावा करत होते असे म्हटले.
कर्जत MIDC चा वाद चिघळला! शिंदेंनी रोहित पवारांकडे मागितला कर्जत-जामखेडचा हिशोब