अतिवृष्टीग्रस्त गावांना आपत्ती व्यवस्थापनातून निधी द्या; लंकेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Provide funds from disaster management to villages affected by heavy rains; Nilesh Lanke demand from District Collector : अहिल्यानगर तालुक्यातील विविध गावांमध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांची हानी झाली असून त्याची दुरूस्ती व सुशोभीकरणासाठी आपत्ती व्यवस्थापनातून निधी मंजूर करण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तारीख ठरली! निवडणुका तोंडावर… मंत्री देसाईंच्या उपस्थितीत शिवसेनेचा अहिल्यानगरमध्ये मेळावा
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, नगर तालुक्यातील गावांमध्ये झालेली अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण होउन सार्वजनिक मालमत्तेस मोठया प्रमाणात नुकसान पोहोचले आहे. या आपत्तीमध्ये रस्ते, पुल, स्मशानभुमी, बंधारे, घाट, वस्ती जोड रस्ते इ. पायाभुत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे सबंधित ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
Mahua Moitra विवाहबंधनात अडकल्या; बीजेडीच्या माजी खासदाराशी जुळलं सुत…
सादर करण्यात आलेली ग्रामपातळीवरील कामे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत पूर, चक्रीवादळ इत्यादी आपत्ती व्यवस्थापन, पूर नियंत्रण व दुरूस्तीअंतर्गत प्रस्तावित करता येतील याकडे खा. लंके यांनी या निवेदनात जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
रहस्य, विनोद अन् ट्विस्ट! ‘गाडी नंबर 1760’ चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
ही कामे मार्गी लावल्यानंतर या गावांतील ग्रामस्थांना सोयी-सुविधा मिळणार असून ग्रामस्थांचे पुनर्वसन, सुरक्षित प्रवास आणि अंत्यसंस्कार, धार्मिक विधींसाठी सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे या कामांच्या निधीसाठी आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत तातडीने मंजुरी देण्यात यावी व कार्यवाहीस गती देण्यात यावी अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.