Raju Waghmare यांना ऐन पत्रकार परिषदेत डुलकी; गोऱ्हेंनी ‘उठा’ म्हणताच खडबडून जागे

Raju Waghmare यांना ऐन पत्रकार परिषदेत डुलकी; गोऱ्हेंनी ‘उठा’ म्हणताच खडबडून जागे

Raju Waghmare sleep Nilam Gorhe awaken in Press Conference : नुकतेच कॉंग्रेसला राम-राम ठोकून शिंदे गटात सामील झालेले राजू वाघमारे ( Raju Waghmare ) आज पुन्हा चर्चेत आले आहेत. याचं कारण होतं. पत्रकार परिषदेमध्ये ( Press Conference ) त्यांना लागलेली डूलकी. यावेळी शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे ( Nilam Gorhe ) यांनी त्यांना उठा आता म्हणत जागं केल्यानंतर ते खडबडून जागे झाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यमध्ये कैद झाला आहे.

‘ते’ मला खासदार करणार? विरोधकांना उत्तर देत विखेंनी सांगूनच टाकलं…

संसद असो किंवा राज्याचे विधीमंडळ यामध्ये अधिवेशना दरम्यान तसेच सभांमध्ये अनेक नेत्यांना, लोकप्रतिनिधींना झोप लागल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारे एखाद्या नेत्याला झोप लागणे. त्याला शेजारच्या व्यक्तीला उठवावे लागणे असा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. असाच प्रकार आज राजू वाघमारे यांच्यासोबत शिर्डीमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना घडला आहे.

काय आहे नेमका प्रकार?

सध्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये आज अहमदनगर उत्तर म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे आणि शिंदे गटाचे उमेदवार असलेले सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरायचा होता. त्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे आणि राजू वाघमारे उपस्थित होते. यावेळी ऐन पत्रकार परिषदेत निलम गोऱ्हे यांच्या शेजारी बसलेले राजू वाघमारे यांना झोप लागली होती. अनेकदा त्यांच्यावर कॅमेरे जात होते. मात्र ते काही उठले नाही. शेवटी निलम गोऱ्हे यांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी त्यांना अता उठा म्हणत उठवलं. तेव्हा वाघमारे हे खडबडून जागे झाले.

मुख्यमंत्र्यांनी विखे कुटुंबावर उधळली स्तुतीसुमन! म्हणाले, कुणीही आलं तरी यांची पाळमुळ…

राजू वाघमारे हे कॉंग्रेसचे प्रवक्ते होते. मात्र काही दिवसांपूर्वी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राजू वाघमारे प्रदीर्घ काळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. त्यामुळे आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube