‘ते’ मला खासदार करणार? विरोधकांना उत्तर देत विखेंनी सांगूनच टाकलं…
Ahmednagar Loksabha : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Loksabha Election) महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी जमा झालेला मोठा जनसमुदाय हा विरोधकांना त्यांनी विचारलेला प्रश्न-उत्तर आहे, अशा अशा शब्दांत आता सुजय विखे यांनी नामोल्लेख टाळत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर निशाणा साधला आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर दक्षिणेमधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे बडे नेते मंडळी देखील यावेळी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार प्रवीण दरेकर आमदार मोनिका राजळे आमदार राम शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते तसेच महायुतीचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
YRF ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; चित्रपटातून गाणे काढून टाकल्याप्रकरणी भरपाई द्यावी लागणार नाही
यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुजय विखे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, रखरखत्या उन्हामध्ये देखील आज मोठ्या संख्येने जो जनसमुदाय जमला आहे. मला विश्वास आहे की, हा जनसमुदाय त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे जे गेल्या अनेक महिन्यांमध्ये किंबहुना सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले जाते तर सर्वांच्या प्रश्नांना उत्तर हे जण समुदायाच्या माध्यमातून दिसले आहे तुला यावेळी खासदार सुजय विखेच असा टोला विखेंनी विरोधकांना लगावला. तसेच निवडणूक हे जनमानसांमध्ये असते, दमलेल्या या जनसमुदायाच्या माध्यमातून जनतेने हे उत्तर दिले आहे.
रावणाची लंका दहन होणार का?
महाविकास आघाडीच्या रूपाने असलेल्या रावणाच्या लंकेचे दहन करा, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार असलेल्या निलेश लंकेंवर निशाणा साधला. दरम्यान, यावर सुजय विखे यांना प्रश्न केला असता त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. विखे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय सांगितला असून तो त्यांचा विषय आहे मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम आणइ माझ्या माध्यमातून झालेला विकास हा जनतेपुढे घेऊन जाणार आहे. आज माझा ठाम विश्वास झाला आहे की जनता ही नरेंद्र मोदी यांच्या पाठीशीच आहे. जनताच आता मला खासदार करेल, असा विश्वास देखील यावेळी सुजय विखे यांनी व्यक्त केला.