Video : शिवसेना आमदार सुहास कांदे बैठकीत संतापले अन् अधिकाऱ्याची तब्येत खालावली

Video : शिवसेना आमदार सुहास कांदे बैठकीत संतापले अन् अधिकाऱ्याची तब्येत खालावली

Shivsena MLA Suhas Kande :  शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांची अधिकाऱ्याला रागावतानाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या व्हिडीओमध्ये सुहास कांदे हे त्या अधिकाऱ्यावर भडकले असून त्याला सुनावताना दिसता आहे. पण यानंतर मात्र, त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक जागेवरच खराब झाल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याचे आमदार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काही प्रश्नावरुन कांदे हे एका अधिकाऱ्यावर संतप्त झालेले पहायला मिळाले. त्यानंतर अचानक त्या अधिकाऱ्याच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याचे दिसून आले.

‘अजित पवार अर्थमंत्री, आता उद्धव ठाकरेंकडे परत जा’; काँग्रेस नेत्याचा शिंदे गटाला खोचक सल्ला

यावेळी कांदे म्हणाले की, “कोणत्या तरी अधिकाऱ्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. आम्ही लोकप्रतिनिधी फक्त बोलत असतो. मात्र, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्हा परिषद ही गुंड चालवतात. परत मला धमकीचे फोन येतात. यांच्या घरची जिल्हा परिषद आहे का सर्व आमदारांनी ठराव करुन एका अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही फक्त बोलतो त्याचा काही उपयोग नाही. संपूर्ण जिल्हा परिषदचे काँट्रॅक्टर यांना भेटतात.”

कृषीमंत्री होताच धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी; वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

दरम्यान, सुहास कांदे यांचा रुद्रावतार पाहून संबंधित अधिकाऱ्याला धडकी भरल्याचे दिसून आले. यामुळे त्या अधिकाऱ्याची तब्येत अचानक खराब झाली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सुहास कांदे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये छगन भुजबळ यांचे सुपूत्र पंकज भुजबळ यांचा पराभव केला होता. पण छगन भुजबळ आता सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुहास कांदे व नाराज झाल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube