एसटी महामंडळाचे तीन तेरा? त्र्यंबकेश्वर मार्गावरील एसटी सेवा बंद, प्रवाशांचा संताप

एसटी महामंडळाचे तीन तेरा? त्र्यंबकेश्वर मार्गावरील एसटी सेवा बंद, प्रवाशांचा संताप

ST Bus : एकीकडे राज्य सरकारकडून अनेक योजना जाहीर केल्या जात आहेत. लाडकी बहीण योजना तर वृद्धांसाठी एसटीमध्ये सवलत देण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या मार्गावरील एसटी बसची सेवा (ST Bus) बंद करण्यात आल्याचा अजब प्रकार समोर आलीयं. त्यामुळे एसटी महामंडळाचे तीनतेरा वाजल्याचं बोललं जातयं.

नागरिकांना त्रास देऊ नका अन् कामचुकारपणा करू नका, जनता दरबारात आ. आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

त्र्यंबकेश्वर मार्गावरील सर्व एस टी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे.महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्याआधी राज्यातील महिलांना 50 टक्के एसटी सवलत आणि 65 ते 75 वयोगटातील वृद्धांना 50% सवलत तर 75 वर्षांवरील वृद्धांना शंभर टक्के एसटी सवलत दिलीयं. या योजनांमुळे मागील काही महिन्यांपासून एसटीचे भारमान आणि उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आलयं.

चांगले उत्पन्न, प्रतिसाद असतानाही गाड्या बंद?
त्र्यंबकेश्वर हे मुंबई आणि ठाणे परिसरातील वयोवृद्धांना तीर्थस्थान म्हणून जवळचे आहे. मुंबई सेंट्रल बस स्थानकातून त्र्यंबकेश्वरसाठी दररोज सकाळी सहा वाजता, सकाळी सव्वा दहा वाजता आणि रात्री सव्वा अकरा वाजता शिवशाही बस सोडण्यात येत होती. सदर बसला चांगला प्रतिसाद मिळत होता. अवघ्या सहा तासात आणि केवळ 464 रुपयात त्र्यंबकेश्वर दर्शनला जातं येत होतं.

मुंबई, पुणे अन् हैदराबाद.. घरांची विक्री सुस्साट; श्रीमंती वाढली, १२ वर्षांचं रेकॉर्डही तुटलं

यातून दररोज एसटीला 32 ते 36 हजार महसूल मिळत असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीयं. मात्र, कोणतीही पूर्व सूचना न देता सदर मार्गांवरील गाड्या प्रशासनाने बंद केल्या आहे. ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून लवकर लवकर गाड्या पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

सरकारला गाड्या बंद करायच्या होत्या तर योजना जाहीर का केली? असा सवाल प्रवाशी अशोक भोईटे यांनी उपस्थिती केला आहे. आम्ही अनेक वेळा या बसvs प्रवास केला आहे तरी लवकरात लवकर गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. सदर मार्गावर एसटी चालक आणि वाहक यांची कमतरता असल्याने सदर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आमचा मानस या मार्गांवरील सेवा लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आलीयं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube