आहिल्यानगर जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; कोपरगाव शहरात घड्याळाच्या दुकानावार डल्ला, आमदार काळेंनी घेतली दखल

Theft Watch Shop in Kopargaon : शहराच्या अहिंसा चौक परिसरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळाच्या दुकानात चोरट्यांनी 33 लाख 69 हजार रुपयांची घड्याळे व रोख रक्कमची चोरी केली. शनीवारी पहाटे साडे तीन वाजता झालेली ही चोरी सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. या चोरीत अज्ञात ६ पेक्षा जास्त चोर सहभागी असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालं आहे. चोरांनी सर्व येथील मौल्यवान घड्याळे बॅगेत भरून हा मुद्देमाल लंपास केला आहे.
उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…
याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील मध्यवर्ती चौकात गुरुद्वारा रोड येथे असलेले सचिन वॉच हे संजय लालचंद जैन यांचे दुकान असून अज्ञात चोरट्यांनी शनीवार (दि.19 एप्रिल)रोजी मध्यरात्री तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानातील 29 लाख 22 हजार रुपये किमतीचे टायटन कंपनीचे 155 व टायमेक्स कंपनीचे 120 घड्याळे असे 275 घड्याळे व 3 लाख 47 हजार रुपये रोख रक्कम असा 33 लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्म, पो.नि. भगवान मथुरे, स.पो.नि.किशोर पवार, पोसई भुषन हंडोरे यांनी भेट दिली आहे.घटने बाबत संजय लालचंद जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 189/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331 (4), 305 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करत आहे.