कोपरगावमध्ये राडा, दोन गटात हाणामारी; आमदारांच्या पीएसह 63 जणांवर गुन्हा

Kopargaon News : कोपरगाव तालुक्यातील मोहनीराजनगर भागात 24 सप्टेंबरच्या रात्री दोन गटामध्ये तूफान हाणामारी आणि दगडफेक झाली असल्याची माहिती

  • Written By: Published:
Kopargaon News

Kopargaon News : कोपरगाव तालुक्यातील मोहनीराजनगर भागात 24 सप्टेंबरच्या रात्री दोन गटामध्ये तूफान हाणामारी आणि दगडफेक झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत 63 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.

किरकोळ कारणावरुन झालेल्या वादानंतर जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक (Kopargaon Crime) केली. या दगडफेकीत 2 पोलीस आणि काही नागरिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते मात्र पोलिसांची संख्या कमी असल्याने जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

63 जणांवर गुन्हा दाखल

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या प्रकरणात 63 जणांवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 16 जणांना ताब्यात देखील घेतले आहे.

छत्रपती संभाजीनगर रस्ता दुरुस्ती करा नाहीतर रस्ता रोको आंदोलन; खासदार लंकेंचा चार दिवसांचा अल्टिमेटम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पोलिसांनी आमदार आशुतोष काळे यांचे स्विय सहाय्यक अरुण जोशी, मनसे शहरप्रमुख आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल केला आहे.

follow us