ब्रेकिंग : ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटणाऱ्या पांडेंची पक्षातून हकालपट्टी; वाघ यांनाही बाहेरचा रस्ता
Vinay Pande ठाकरे बंधूंच्या युतीनंतर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का माजी महापौर विनायक पांडे भाजपच्या गळाला
Nashik UBT Leader Vinay Pande & Yatin Wagh Remove From Party : ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर मोठ्या जल्लोषात पेढे वाटणारे माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) आणि यतिन वाघ यांना ठाकरेंनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पक्ष विरोधी कारवायांबद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र! असे राऊतांनी एक्सवर पोस्ट करत जाहीर केले आहे.
पक्ष विरोधी कारवायां बद्दल
नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) December 25, 2025
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे, ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोष करणारे माजी महापौर विनायक पांडे हे भाजपच्या गळाला लागल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. मात्र, या पक्षप्रवेशाला देवयानी फरांदे यांनी जाहीर दर्शवला आहे. यामुळे आता नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. एवढेच नव्हे तर, मनसेचे पहिले महापौर आणि गेल्या काही वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत असणारे यतीन वाघ आणि काँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे हे देखील भाजप प्रवेश करणार आहेत. Nashik UBT Leader Vinay Pande & Yatin Wagh Remove From Party
पक्षप्रवेशाला फरांदेंचा थेट विरोध
मात्र या पक्षप्रवेशाना भाजप आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. फरांदे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आज होत असलेल्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे, “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं फरांदेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही.”
जय श्री राम… pic.twitter.com/Qv2bp7mzzt— MLA Devyani Pharande (@PharandeDevyani) December 25, 2025
मुलाचं तिकिटं एकदा नाही दोनदा कापलं
ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करताना विनायक पांडेंनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ते म्हणाले की, मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाला तिकिटची मागणी केली होती. मुलाने मतदारसंघात कामही सुरू केले, पण यंदाही तिकीट कापले. त्यामुळे यावेळी सूनबाईला निवडणुकीत उतरवत आहोत, भाजपमधून ही उमेदवारी देण्यात आल्याचेही पांडे यांनी यावेळी सांगितले.
ठाकरे बंधूंची युती होताच, शरद पवारांचा मोठा निर्णय थेट ठाकरे गटाशी चर्चाच थांबवली
आता आम्ही मनसे अन् ठाकरेंचा सुपडा साफ करणार
आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली. पण त्यांनी तिकीटाबाबतीत ठोस सांगितले नाही. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत मधले नेते जाऊ देत नाहीत. माझी नाराजी कोणावर नाही. आम्ही संपूर्ण पॅनल तयार केला आहे, पॅनल निवडून येणार, त्यांना उमेदवार ही मिळणार नाही, ठाकरे यांच्यावर नाराजी नाही स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून डावलले गेले होते, आताही तसेच होत होते, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे असं विनायक पांडेंनी पक्ष सोडताना म्हटलं आहे.
