Rohit Pawar : रोहित पवारांच्या मोर्च्यात जाऊ नका, शरद पवार गटाकडून कार्यकर्त्यांना आदेश; कारण काय?

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार महायुतीविरोधात नागपरूमध्ये न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे.

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Rohit Pawar

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार महायुतीविरोधात नागपरूमध्ये न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे. मात्र या मोर्च्यात सहभागी होऊ नये असे सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्याकडून विदर्भातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीनंतर आमदार रोहित पवार यांचे पंख त्यांच्याच पक्षाकडून कापले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

सध्य समोर आलेल्या माहितीनुसार, या मोर्च्यासाठी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी रविवारी (22 नोव्हेंबर) रोजी विदर्भातील (Vidarbha) जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष ग्रामीण आणि शहरी जिल्ह्यध्यक्ष (NCPSP) यांची बैठक घेतली होती. या बैठकीत शेगाव ते बुटीबोरीमार्ग नागपूर (Nagpur) विधान भवन मोर्चाचे आयोजन करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडून जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांना वेगळ्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केवळ प्रदेश कार्यालयातून ज्या सूचना प्राप्त होतील त्याच पाळाव्यात असं पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. रोहित पवार यांच्या कोणत्याही आंदोलनात सहभागी न होण्याच्या देखील सूचना शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती एबीपी माझाने आपल्या वृत्तात दिली आहे.

तुतारी चिन्ह न वापरता मोर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या सूचनेनंतरही रोहित पवार मोर्चा काढण्यावर ठाम असून पक्षाच्या तुतारी चिन्ह न वापरता रोहित पवार मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहित पवार यांच्याकडून घेण्यात आलेल्या बैठकीत विदर्भातील पक्षाचे सर्व पदाधिकारी नेते आणि कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने पुढे काय होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. रोहित पवार विदर्भ क्षेत्रातील सर्व शेतकरी, शेतमजूर यांच्या मागण्या घेऊन विधिमंडळावर 9 डिसेंबरला मोर्चा काढणार आहे.

अलिबागमध्ये जमीन लाटण्याचा आरोपच; संजय राऊतांच्या आरोपावर राहुल नार्वेकर म्हणाले…

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणार असून केंद्रात आणि राज्यात देखील सत्तेत सहभागी होणार असून याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. मात्र रोहित पवार यांनी भाजपासोबत जाण्यास नकार दिल्या असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळेच आता पक्षात रोहित पवार यांना डावलण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us