मोठी बातमी! बारामतीत 5 तारखेपासून ओबीसींचं आंदोलन, लक्ष्मण हाकेंची घोषणा

मोठी बातमी! बारामतीत 5 तारखेपासून ओबीसींचं आंदोलन, लक्ष्मण हाकेंची घोषणा

OBC Protest From 5 September Laxman Hake Announcement : पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राज्य सरकारवर आणि मंत्रिमंडळ उपसमितीवर जोरदार टीका (OBC Protest) केली. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) अनुषंगाने सरकारने काढलेल्या जीआरला त्यांनी ओबीसी आरक्षण उध्वस्त करणारा आणि संविधानविरोधी निर्णय ठरवत बेकायदेशीर म्हटलं.

ओबीसी आरक्षण संपवणारा आदेश

हाके म्हणाले की, हा जीआर म्हणजे ओबीसी आरक्षण संपवणारा आदेश आहे. घुसखोरी करणाऱ्यांना सरकारने सरकारी वाट करून दिली आहे. एवढ्या महत्त्वाच्या निर्णयावर छगन भुजबळ यांच्याशिवाय कोणीही बोलत नाही, हे आश्चर्यकारक आहे.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी ‘या’ सवयी महत्त्वाच्या! डॉक्टरांचा सल्ला काय, जाणून घ्या

सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवताना त्यांनी काही नेत्यांवर थेट आरोप केले. साडे 28 किलोच्या जरांगेने झुंडशाहीच्या जोरावर हे केलं आहे. एवढ्या वयोवृद्ध नेत्याने—विखे पाटील यांनी—ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला आहे. मुख्यमंत्री स्वतः बळी पडले आहेत. शरद पवारांनी आंदोलन उभं करण्याचं काम केलं आणि रोहित पवारांचे आयटी सेल हे आंदोलन चालवत होते, असे आरोप हाकेंनी केले.

नेमकी फसवणूक कुणाची?

हाके यांनी पुढे म्हटलं की, मराठा आणि कुणबी वेगळे आहेत, हे अनेक कोर्टांनी सांगितलं आहे. तरीदेखील उपसमितीने कुणाच्या सांगण्यावरून हा जीआर काढला, हे सरकारनं स्पष्ट करावं. उपसमिती मूळात बायस आहे. मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. हा जीआर माहिती पुस्तिका नाही, मग नेमकी फसवणूक कुणाची झाली आहे?

कमबॅकनंतर अभिजीत सावंतची दमदार कामगिरी; तुझी चाल तुरु तुरुचा 15 मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

बहिष्कार टाकावा

यापुढे संघर्षाचा इशारा देत त्यांनी सांगितलं की, हा जीआर फक्त ओबीसींचाच नाही तर एसटी-एनटी समाजाच्या आरक्षणालाही धक्का पोहोचवणारा आहे. आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे. सत्तेत आणि विरोधकांना जाब विचारावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी बेकायदा काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरही बहिष्कार टाकावा लागणार आहे. हाके यांनी छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगत, या निर्णयाविरोधात कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यांनी घोषणा केली की, 5 सप्टेंबरपासून बारामतीतून आंदोलन सुरू करण्यात येईल.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube