अरे बापरे! मुंबईत मराठा आंदोलकांवर तब्बल 9 गुन्हे; बेकायदेशीर जमाव, रस्ते अडवले…

अरे बापरे! मुंबईत मराठा आंदोलकांवर तब्बल 9 गुन्हे; बेकायदेशीर जमाव, रस्ते अडवले…

Mumbai Police File Criminal Cases Against Maratha Protesters : अखेर पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण संपलं.  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लाट मुंबईपर्यंत पोहोचली (Mumbai) होती. त्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे (Maratha Protest) दाखल करण्याची कारवाई करण्यात आली होती. झोन 1 च्या हद्दीतील एकूण 9 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत.

एकूण 9 गुन्हे…

आझाद मैदान पोलीस ठाण्यात सर्वाधिक 3 गुन्हे, मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात 2 गुन्हे, तर जे.जे. मार्ग, कुलाबा, एम.आर.ए. मार्ग आणि डोंगरी पोलीस ठाण्यांत प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाच्या काळात बेकायदेशीर जमाव जमवणे, रस्ता अडवणे, सार्वजनिक वाहतुकीत अडथळा निर्माण करणे यांसारखी कृत्ये करण्यात आली. या कृत्यांमध्ये सहभागी असलेले आंदोलकांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, गुन्हे अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल केले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सत्तेची पोळी भाजली! मराठा आरक्षणाच्या ‘जीआर’वरून रोहित पवारांनी सरकारलं घेरलं, आंदोलकांची फसवणूक…

सार्वजनिक ठिकाणी अडथळे…

मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेले आंदोलन गेल्या काही दिवसांत तीव्र झाले आहे. मुंबईतील आझाद मैदान परिसरात आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना परवानगीशिवाय जमाव जमवणे व सार्वजनिक
ठिकाणी अडथळे निर्माण करणे थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, ते न पाळल्याने गुन्हे दाखल करण्याची वेळ आली.

GST Council Meeting: कपडे, शूज आणि कार होणार स्वस्त? आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

नाराजीचे वातावरण

या कारवाईमुळे आंदोलनकर्त्यांत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाचे नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत की, आंदोलन शांततेने पार पाडले जात असतानाही सरकार आंदोलकांना गुन्ह्यांमध्ये अडकवून दडपशाही करत आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube